Solapur News: गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे व धरण अद्याप तुडुंब भरून असल्यामुळे आपले आगमन लांबणीवर टाकलेले स्थलांतरित पक्ष्यांपैकी समुद्रपक्षी (सी गल्स) उजनी धरणावर दाखल झाले आहेत. ज्येष्ठ पक्षी अभ्यासक डॉ. अरविंद कुंभार यांनी नुकतेच उजनी परिक्रमा करून ही माहिती दिली..डिकसळ (ता. इंदापूर) जवळच्या जुना रेल्वे पूल परिसर, कोंडारचिंचोली, टाकळी, कात्रज, पोमलवाडी, केत्तूर (ता. करमाळा), काळेवाडी, पळसदेव, भिगवण (ता. इंदापूर) आदी उजनीच्या काठावरील गावांच्या विस्तृत जलाशयावर हे पक्षी मासेमारी करत तरंगताना दिसत आहेत..Migratory Birds: परदेशी पक्ष्यांचा पालघरमध्ये मुक्काम.दक्षिण रशिया, पूर्व मंगोलिया, पॉलिआर्क्टिक, हिमालयातील मानसरोवर तसेच लडाख भागातील सरोवर व सागरी किनाऱ्यावर मासेमारी करणारे विविध प्रजातींचे गलपक्षी उजनी जलाशयावर दरवर्षी हिवाळ्यात येतात..Migratory Birds: भोरड्या पक्ष्यांच्या आकाशातील मनमोहक कवायती .त्यापैकी ‘ब्लॅक हेडेड गल’ मागील आठवड्यात दाखल झाले आहेत. उजनी धरण या वर्षी पूर्ण क्षमतेने भरलेले असून, माशांच्या वाढीसाठी पोषक वातावरण आहे. या माशांवर उदरनिर्वाहासाठी गल पक्ष्यांबरोबर नानातऱ्हेचे बदक येऊन दाखल होतील, असा अंदाज आहे..एरव्ही खाऱ्या पाण्यातील माशांचे चव चाखण्यात व्यस्त असणारे हे मत्स्याहारी पक्षी उजनीतील पाण्यातील माशांवर डल्ला मारण्यात सक्रिय झाल्याचे पाहून पक्षी निरीक्षकांत उत्साह बळावला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.