गोवर्धन पिंगळे, रोहन जाधव, यशवंत जगदाळेमायक्रोग्रीन म्हणजे कोवळ्या पालेभाज्या. या कोवळ्या पालेभाज्यांची उंची साधारण ७ ते १० सेंमी झाली की, त्यांची काढणी केली जाते. भाज्यांना एक प्रकारचा सुगंध येतो आणि त्यात अनेक सूक्ष्म पोषकतत्त्वे असतात. भाज्यांचे रंग आणि पोत विविध प्रकारचे असतात. मायक्रोग्रीन भाज्या सहजपणे उत्पादित करता येतात. .कोवळ्या भाज्या विविध प्रकारच्या जागांमध्ये म्हणजेच घराबाहेरील जागेत, हरितगृहामध्ये आणि अगदी तुमच्या घराच्या खिडकीतही उत्पादित करता येतात. रोपाला पहिले खरे पान दिसताच काढणीस तयार मानले जाते. या अवस्थेत पोषकतत्त्वांची उपलब्धता पूर्ण वाढ झालेल्या भाज्यांच्या तुलनेत ५ ते १० पट जास्त असते. यामुळेच मायक्रोग्रीन्सना ‘फंक्शनल फूड’ किंवा ‘सुपरफूड’ म्हणून ओळखले जाते..Microgreens : अवघ्या एका आठवड्यात उत्पादन देणारे मायक्रोग्रीन्स.उत्पादन पद्धतीमायक्रोग्रीन्स माती, पीट मॉस, हायड्रोपोनिक्स किंवा तंतुमय मॅट्समध्ये उत्पादित केले जाते. उदासीन ते किंचित आम्लीय पाण्याची गरज भासते. लागवडीपूर्वी बियाणे रात्रभर भिजवतात, ज्यामुळे उगवण सुधारते.प्रकाश हा उत्पादनाचा महत्त्वाचा घटक आहे. नैसर्गिक सूर्यप्रकाशाबरोबरच एलईडी दिव्यांचा वापर केला जातो. त्याद्वारे विशिष्ट तरंगलांबी नियंत्रित करता येतात.निळा प्रकाश ः क्लोरोफिल, अँथोसायनिन्स वाढवतो.लाल प्रकाश ः अँटिऑक्सिडंट्स, फिनॉलिक संयुगे वाढवतो.यू व्ही - ए/हिरवा प्रकाश ः खनिजे व फाइटोन्यूट्रिएंट्सवर परिणाम करतो. तापमान, आर्द्रता आणि योग्य प्रकाशाची उपलब्धता ठेवून सातत्यपूर्ण उत्पादन घेता येते..चवमायक्रोग्रीनच्या प्रकारानुसार त्यांची चव सपकपासून तिखटापर्यंत, काही वेळा थोडीशी आंबट किंवा तुरट असते. सामान्यपणे त्यांचा स्वाद उग्र असतो.पोषकतत्त्वेमायक्रोग्रीन्समध्ये पोषक घटक मुबलक प्रमाणात असतात. त्यांच्यातील पोषक घटक अर्क स्वरूपात असतात. याचाच अर्थ परिपक्व पालेभाज्यांच्या (पूर्णपणे वाढलेल्या भाज्या) तुलनेत यामध्ये जीवनसत्त्वे, क्षार व अँटिऑक्सिडंट्सची पातळी अधिक असते. परिपक्व पालेभाज्यांच्या तुलनेने मायक्रोग्रीनमधील पोषक घटकांची पातळी नऊ पटींपर्यंत अधिक असू शकते.प्रत्येक मायक्रोग्रीनमधील पोषक घटकांमध्ये थोडाफार फरक असला तरी बहुतेक प्रकारांमध्ये पोटॅशिअम, लोह, झिंक, मॅग्नेशिअम, तांबे हे घटक मुबलक प्रमाणात असतात. मायक्रोग्रीन्समध्ये त्यांच्या परिपक्व स्वरूपाच्या तुलनेने पॉलिफेनॉल्स आणि इतर अँटिऑक्सिडंट्स अधिक प्रमाणात असतात. पिकलेल्या पानांच्या तुलनेने कोवळ्या पानांमध्ये ४० टक्के अधिक पोषक घटक असतात..काढणीनंतरच्या समस्यामायक्रोग्रीन्सचा श्वसनदर जास्त असल्याने लवकरच वाळते, पोषकता कमी होते. खोलीच्या तापमानावर टिकवण क्षमता फक्त ३ ते ५ दिवस असते. योग्य शीतकरण सुविधा असेल तर हा कालावधी ७ ते २१ दिवसांपर्यंत वाढवता येतो. १ ते ५ अंश सेल्सिअस तापमान सर्वोत्तम मानले जाते. मात्र गोठविल्यास पानांचे नुकसान होते.मॉडिफाइड अॅटमॉस्फिअर पॅकेजिंग तंत्रज्ञानाने श्वसनदर कमी करून टिकवण क्षमता वाढवता येते. पण प्रत्येक पिकासाठी तंत्रज्ञानाचा वापर वेगवेगळ्या पद्धतीने करावा लागतो.काढणीनंतर मायक्रोग्रीन्स धुतल्याने आर्द्रता वाढवते, ज्यामुळे कुजण्याचा धोका असतो. त्यामुळे काही उत्पादक ‘लिव्हिंग मायक्रोग्रीन्स’ (मुळांसह) विकतात..टिकवण क्षमता वाढविण्याचे उपायकाढणी पूर्व उपाय ः कॅल्शिअम क्लोराइड फवारणीमुळे अँटिऑक्सिडंट्स वाढतात. यामुळे पीक टिकून राहते.काढणीपश्चात उपाय ः शीतकरण, मॉडिफाइड अॅटमॉस्फिअर पॅकेजिंग तंत्रज्ञान, थंड वाहतूक साखळी..सूक्ष्म हिरव्या भाज्यांवर सुरू आहे संशोधन.मायक्रोग्रीन्सचे प्रकारमायक्रोग्रीन्स विविध वनस्पती कुळांमध्ये मोडतात.ब्रॅसिकेसी ः ब्रोकोली, कोबी, केल, मुळा, मोहरी, अरुगुला. यामध्ये ग्लुकोसिनोलेट्स व अँटिऑक्सिडंट्स जास्त प्रमाणात असतात.अमरँथेसी ः पालक, बीट, तांदुळजाअॅपिएसी ः कोथिंबीर, अजमोदा, शेपू, गाजर, बडीशेपअॅस्टेरेसी ः लेट्यूस, सूर्यफूल, एन्डाइव्हफॅबेसी ः हरभरा, मेथी, अल्फाल्फा, वाटाणेलॅमिएसी ः तुळस, पुदीना, चियापोएसी ः मका, लेमनग्रासपॉलीगोनॅसी ः बकव्हीटपोर्टुलॅकेसी ः घोळप्रत्येक कुळाचे स्वतंत्र पोषक आणि औषधी गुणधर्म असतात. उदाहरणार्थ, ब्रॅसिकेसी पिकांमध्ये कर्करोगविरोधी संयुगे तर फॅबेसी पिकांमध्ये प्रथिने जास्त प्रमाणात आढळतात..आजारांवर नियंत्रणहृदयविकारमायक्रोग्रीन्समध्ये पॉलिफेनॉल्स मुबलक प्रमाणात असतात. पॉलिफेनॉल्स हे एक प्रकारचे अँटिऑक्सिडंट्स आहे. त्यांचा संबंध हृदयविकाराचा धोका कमी होण्याशी आहे.अल्झायमरअँटिऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असलेला आहार आणि खास करून ज्यात पॉलिफेनॉलचे प्रमाण अधिक आहे अशा घटकांचा आहारात समावेश केल्यामुळे अल्झायमरसारख्या आजाराचा धोका कमी होतो.मधुमेहअँटिऑक्सिडंट्समुळे मानसिक ताण कमी होण्यास मदत होते. या तणावामुळे पेशींमध्ये शर्करा शोषून घेण्याला प्रतिबंध होतो. प्रयोगशाळेत केलेल्या अभ्यासानुसार मेथीच्या मायक्रोग्रीन्समुळे पेशींमध्ये शर्करा शोषून घेण्याचे प्रमाण २५ ते ४४ टक्क्यांनी वाढते.कर्करोगअँटिऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असलेली फळे व भाज्या, विशेषतः पॉलिफेनॉल्स अधिक असलेल्या भाज्या व फळांमुळे विविध प्रकारच्या कर्करोगांची शक्यता कमी होऊ शकते..आहारातील समावेशसँडविच, रॅप्स आणि सलाड्ससारख्या विविध पदार्थांमध्ये मायक्रोग्रीन्सचा वापर करतात.मायक्रोग्रीन्सचा रस काढून किंवा गर काढून त्याचे सेवन करता येते. व्हीटग्रास ज्यूस हे रसरूपातील मायक्रोग्रीनचे लोकप्रिय उदाहरण आहे.पिझ्झा, सूप, ऑम्लेट, आमटी आणि इतर गरम पदार्थांवर सजावट करण्यासाठी मायक्रोग्रीन्सचा वापर करतात- यशवंत जगदाळे ९६२३३८४२८७, (प्रकल्प प्रमुख, भाजीपाला गुणवत्ता केंद्र, कृषी विज्ञान केंद्र, बारामती, जि.पुणे).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.