Rural Employment : अमरावती रोहयोअंतर्गत विहिरी, गुरांचे गोठे आणि इतर कामे पूर्ण करूनही अनुदान मिळाले नसल्याने तिवसा तालुक्यातील ९० शेतकऱ्यांनी पंचायत समितीत अडीच तास ठिय्या आंदोलन केले. गटविकास अधिकारी अभिषेक कासोदे यांच्या दालनासमोर आंदोलन करीत प्रलंबित निधी तातडीने देण्याची मागणी करण्यात आली..रोहयोअंतर्गत कामे पूर्ण करण्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी उसनवारी, कर्ज तसेच उपलब्ध साधनसामग्री विकून खर्च केला. मात्र, कामे पूर्ण होऊनही अनुदानाची रक्कम मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. प्रलंबित निधीसाठी रोहयो उपजिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच उपजिल्हा कार्यक्रम समन्वयक यांच्याकडे निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करणारे पत्र पाठविण्याचे लेखी आश्वासन पंचायत समिती प्रशासनाने दिले..Women Empowerment: महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक : प्रभावी अंमलबजावणीची गरज.तिवसा तालुक्यातील प्रलंबित रकमेपैकी २०२४-२५ मधील ४ लाख ४७ हजार रुपये, २०२५-२६ मधील १ कोटी ८७ लाख १० हजार रुपये आणि २०२६-२७ मधील ६७ लाख ५६ हजार रुपये अद्याप मिळालेले नाहीत. त्यातील १ कोटी ३१ लाख ७५ हजार १४४ रुपये पंचायत समिती स्तरावरील कामांचे शासनाकडे प्रलंबित असल्याची माहिती गटविकास अधिकारी अभिषेक कासोदे यांनी दिली..Krishi Samruddhi Subsidy : कृषी समृद्धीच्या थकीत अनुदानापोटी १,२७८ कोटी मंजूर.येत्या आठ दिवसांत प्रलंबित रक्कम न मिळाल्यास पंचायत समितीच्या आवारात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या भजनाचा कार्यक्रम घेण्यासोबतच शेतकऱ्यांना सहकुटुंब पंचायत समितीच्या आवारात आणून दसरा-दिवाळी साजरी करण्याचा इशारा आंदोलक प्रशांत कांबळे यांनी दिला..आंदोलनात अमोल मरसकोल्हे, उषा घोम, नत्थू बेलसरे, पन्नालाल कोचर, ज्योती गावंडे, शंकर उईके, सुनील टापरे, रामदास निस्ताने, प्रमोद बंड, अशोक कुरळकर, दिलीप तिखे, अनिल बेलसरे यांच्यासह अनेक शेतकरी सहभागी झाले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.