Government Scheme: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत चिखलदरा तालुक्यातील दहेंद्री येथे शेतकऱ्यांना सिंचन विहिरींचा दुबार लाभ देण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी १२ रोजगार सेवक व दोन तांत्रिक अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याने संपूर्ण मेळघाटात खळबळ उडाली आहे.