Ahilyanagar News : पावसाने दडी मारल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. मजुरांच्या हातालाही काम नाही. मात्र, ‘रोहयो’मुळे त्यांना तुटपुंज्या का होईना रोजगारावर गुजराण होत आहे. सुमारे दहा हजार मजूर कामावर आहेत..महात्मा गांधी रोजगार हमी योजनेद्वारे ग्रामीण भागात गरजूंना १०० दिवसांचा हक्काचा रोजगार दिला जातो. त्यानुसार जिल्ह्यात रोहयोतून २ हजार ८४१ कामे सुरू आहेत. जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाची २ हजार ४९५ तर वन, पाटबंधारे, बांधकाम विभागांची ३४६ कामे आहेत. कृषी विभागाच्या फळबाग लागवडीसाठी मजुरांमार्फत खड्डे खोदले जात आहेत. .MGNREGA Wages : पैसे द्या, पैसे द्या… ‘कुशल’चे पैसे द्या .घरकुले, शोषखड्डे, रस्ते, सिमेंट नाला बांध, दगडी नाला बांध, गॅबियन बंधारे, शोषखड्डे, सार्वजनिक शोषखड्डे, सलग समतल चर, पाझर तलाव दुरुस्ती, जमीन सपाटीकरण, गाळ काढणे, वनीकरण, रस्ता दुतर्फा वृक्षारोपण, रोपवाटिका या पारंपारिक कामासोबत सिंचन विहीर, सार्वजनिक विहीर, शेततळे, फळबाग लागवड, रेशीम उत्पादन, बांधावरील वृक्ष, घरकूल, सामूहिक गोठे, मत्स्यपालन, शौचालय, रस्ता खडीकरण, मुरमीकरण, सिमेंट रस्ता, डांबर रस्ता, ग्रामसंघ इमारत, बाजार ओटा, स्मशानभूमी शेड, सार्वजनिक ठिकाणी सुशोभीकरण आदी कामे ‘रोहयो’तून सुरू आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक मजूर जामखेडला ४६१ कामांवर १ हजार ७२० मजूर तर कोपरगावला सर्वात कमी १८७ मजूर आहे..MGNREGA Fund : ‘मनरेगा’च्या अंमलबजावणीत निधी उपलब्धतेचा अडसर .तालुकानिहाय सुरू असलेली कामेअकोले १७३, जामखेड ४६१, कर्जत २४७, कोपरगाव २१२, नगर २६७, नेवासे २२५, पारनेर १८४, पाथर्डी २९२, राहाता ६१, राहुरी १५५, संगमनेर ८२, शेवगाव २२६, श्रीगोंदे २०८ व श्रीरामपूर ४८ कामे सुरू आहे. जिल्ह्यात २ हजार ८४१ कामे सुरू आहेत..तालुकानिहाय मजूरअकोले ५३९, जामखेड १ हजार ७२०, कर्जत १ हजार ९४, कोपरगाव १८७, नगर ५८४, नेवासे ९०७, पारनेर २३२, पाथर्डी १ हजार ११०, राहाता ३०३, राहुरी ६५७, संगमनेर ४१६, शेवगाव १ हजार १५१, श्रीगोंदे ८३५ व श्रीरामपूर २२६ मजुरांचा समावेश आहे. जिल्ह्यात ९ हजार ९६१ मजूर कार्यरत आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.