Weed Management : परभणी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात गाजरगवत निर्मूलन सप्ताहानिमित्त शनिवारी (ता. २२) विशेष मोहीम राबविण्यात आली. परोपजीवी कीटक संशोधन योजना व कीटकशास्त्र विभागातर्फे कुलगुरू डॉ. इंद्र मणी मिश्रा यांच्या हस्ते अखिल भारतीय समन्वयित सिंचन पाणी व्यवस्थापन प्रकल्पाच्या प्रक्षेत्रावर गाजरगवताच्या जैविक नियंत्रणासाठी मेक्सिकन भुंगे सोडण्यात आले..संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार, शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे, अधिष्ठाता डॉ. प्रवीण वैद्य, प्रभारी अधिकारी डॉ. श्रद्धा धुरगुडे यांची प्रमुख उपस्थिती होती..Gajar Gavat Control: गाजर गवताच्या प्रभावी नियंत्रणासाठी काय करावे?.मेक्सिकन भुंग्याचे प्रौढ तसेच अळ्या गाजरगवताची पाने खात असल्याने पानांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. परिणामी, गाजरगवताची वाढ व पुनरुत्पादन क्षमता कमी होण्यास मदत होते. विद्यापीठ परिसरात या जैविक नियंत्रण घटकांची संख्या वाढवून गाजरगवताचे पर्यावरणपूरक व शाश्वत व्यवस्थापन करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला..डॉ. इंद्र मणी मिश्रा म्हणाले, ‘‘गाजरगवत उपटून त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावणे तसेच त्यापासून नैसर्गिक खत तयार करणे शक्य आहे. भविष्यात गाजरगवताचे समूळ निर्मूलन करण्यासाठी जैविक उपाययोजनांना अधिक चालना देण्याची गरज आहे.’.White Grub Control: हुमणी अळीचा प्रादुर्भाव वाढला? जैविक नियंत्रणावर द्या भर .डॉ. पुरुषोत्तम नेहरकर म्हणाले, ‘‘विद्यापीठ परिसरात गाजरगवत निर्मूलनासाठी कृषी कार्यानुभव कार्यक्रमातील विद्यार्थ्यांच्या माध्यमातून विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे..’ उपसंचालक (बियाणे) डॉ. हिराकांत काळपांडे, एकात्मिक शेती पद्धतीचे प्रभारी अधिकारी डॉ. किरण जाधव, पाणी व्यवस्थापन योजनेचे प्रभारी अधिकारी डॉ. हरीश आवारी, सहाय्यक कीटकशास्त्रज्ञ डॉ. दिगंबर पटाईत, डॉ. अनंत लाड, डॉ. धनंजय मोहोड, कृषी अभियंता डॉ. विशाल इंगळे, वरिष्ठ संशोधन सहाय्यक ऋषिकेश औंढेकर, संशोधन सहयोगी डॉ. राजरत्न खंदारे, डॉ. योगेश मात्रे आदींसह कीटकशास्त्र विभागातील अधिकारी, कर्मचारी, पदव्युत्तर व आचार्य पदवीचे विद्यार्थी तसेच गोळेगाव (ता. औंढानागनाथ) येथील कृषी महाविद्यालयातील रावेच्या विद्यार्थिनींनी सहभाग घेतला..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.