Amravati News: मेळघाटमधील आदिवासी बांधवांना आरोग्यसेवा तत्काळ मिळावी, यासाठी तत्कालीन आरोग्यमंत्र्यांनी टेलिमेडिसीनला प्राधान्य दिले होते. मात्र याच प्रोजेक्टला आता टाळे लागले आहे. त्यामुळे आता तज्ञांचा सल्ला मिळण्यासाठी अडचण निर्माण होत आहे. तसेच मेळघाटातील डॉक्टर तथा रुग्णांना तज्ज्ञांच्या मार्गदर्शनापासून वंचित राहावे लागत आहे..मेळघाटात दरवर्षी होणारे बालमृत्यू तथा मातामृत्यूला आळा घालण्यासाठी वेळेवर तज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध व्हावे, यादृष्टिकोनातून टेलिमेडिसीन हा प्रकल्प राबविल्या गेला. तेव्हा तत्कालीन आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी पदभार सांभाळताच टेलिमेडिसीनला प्राधान्य दिले होते. मेळघाटच्यासेमाडोह येथे टेलिमेडिसीन सेंटर सुरू केले होते. येथील रुग्णांना प्रभावी उपचारांसाठी तंत्रज्ञानाचीही गरज असल्याचे त्यांचे म्हणणे होते. दिल्यास मात्र आता त्यांच्या ड्रीम प्रोजेक्टला टाळेलागले आहे..Smart Projects: ‘स्मार्ट’च्या माध्यमातून कृषी व्यवसायाचे सक्षमीकरण साध्य: खरडे.टेलिमेडिसीन सेवेच्या माध्यमातून तज्ञ डॉक्टरांशी संपर्क साधून गंभीर आजार किंवा तातडीच्या व गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेच्या वेळी रुग्णांवर कोणते आणि कसे औषधोपचार करावेत, याबाबतचा सल्ला घेऊन रुग्णांवर तत्काळ उपचार करण्यास मदत होत होती. टेलिमेडिसीनच्या माध्यमातून गंभीर आजार किंवा तातडीची तथा गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेच्या वेळी रुग्णांवर कोणते व कसे.Krishi Project: कृषी संजीवनी प्रकल्प समितीच्या सहअध्यक्षपदी आ. सावरकर.औषधोपचार करावेत, यासंदर्भात थेट मुंबई, पुणे व नागपूर येथील तज्ज्ञ डॉक्टरांशी संपर्क साधून रुग्णांवर उपचार करणे सोईस्कर होत होते. आता मात्र येथील टेलिमेडिसीन सेवा पूर्णतः बंद पडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे..मेळघाटातील टेलिमेडिसीन सेंटरचा कॉन्ट्रॅक्ट कंपनीला दिले होते. ते कॉन्ट्रॅक्ट संपले तेव्हापासून हरिसाल, सेमाडोह येथील टेलिमेडिसीन सेंटर बंद आहेत. मात्र याबाबतची अधिक माहिती मला नाही. माहिती घेऊन सांगतो.-प्रवीण पारिसे, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.