Meghalaya Organic Spices: मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) च्या जिओ वर्ल्ड ड्राइव्ह येथे ‘मेघालय स्पाइस फेस्टिव्हल’चे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या माध्यमातून मेघालयाने भारतात तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतः एक प्रीमियम सेंद्रिय मसाल्यांचे केंद्र म्हणून आघाडी घेण्यासाठी मोठे पाऊल उचलले. .यासाठी मेघालयातून १४० सदस्यांचे शिष्टमंडळ मुंबईत आले होते. यात शेतकरी, मसाला उद्योजक, सहकारी संस्थांमधील नेते आणि वरिष्ठ शासकीय अधिकारी यांचा समावेश होता. त्यांनी यावेळी मुंबई तसेच इतर प्रमुख बाजारांतील संस्थात्मक खरेदीदार, किरकोळ विक्रेते, निर्यातदार आणि हॉटेल क्षेत्रातील प्रतिनिधींशी थेट संवाद साधला..‘मेघालय स्पाइस फेस्टिव्हल’च्या माध्यमातून खरेदीदार, विक्रेते यांच्यात संवाद घडवून आणण्यात आला. यासोबतच मसाले आणि पर्यटन क्षेत्रावर केंद्रित बैठकांचेही आयोजन करण्यात आले. मेघालयाच्या सेंद्रिय मसाला परिसंस्थेतील संधी यावर आयोजित उच्चस्तरीय चर्चाही करण्यात आली. .Spice Business: मसाला उद्योगाने तीन कुटुंबांना दिला रोजगार.थेट प्रक्रिया प्रात्यक्षिके, टेस्टिंग काउंटर आणि किरकोळ विक्री प्रदर्शनामुळे हे संपूर्ण ठिकाण एक सक्रिय बाजारपेठ बनल्याचे दिसून आले. यावेळी दिवसभर खरेदीविषयक चर्चा करण्यात आली. निर्यातीची माहिती आणि भागीदारीसंबंधी वाटाघाटी करण्यात आल्या. यातून मेघालयाच्या प्रीमियम सेंद्रिय उत्पादनांबाबत व्यावसायिक कल दिसून आला..Spice Crops: मसाला पिकांसाठी ९५४ शेतकऱ्यांची निवड.मेघालयाचे मुख्य सचिव डॉ. शकील पी. अहमद यांनी, राज्याच्या शेती पायाभूत व्यवस्थेविषयी माहिती दिली. मेघालयातील शेतकरी पर्यावरणीय समतोल आणि नैसर्गिक शेती पद्धतींबाबत अत्यंत कटिबद्ध असल्याचे त्यांनी नमूद केले. मेघालय सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाचे आयुक्त आणि सचिव डॉ. विजय कुमार डी. यांनी राज्याच्या वाढत्या जागतिक स्तरावरील उपस्थितीबाबत माहिती दिली. .मेघालयातून हळदीसोबत आता आल्याची निर्यातमेघालयाची हळद आधीच देशांतर्गत बाजारांसह अमेरिका, मध्य पूर्व आणि युरोपमधील विविध देशात पोहोचत आहे. तर या वर्षी मेघालयातून सिंगापूरला आल्याची निर्यात सुरू करण्यात आली.राज्याच्या शेतमाल उत्पादनाबाबत ते पुढे म्हणाले, आमच्याकडे जगातील सर्वोत्तम हळद आहे. आम्ही जिथेही जातो, तिथे हेच आम्ही सांगतो. तसेच, पुढील काही महिन्यांत मेघालयातील सर्वात मोठ्या मसाला प्रक्रिया उद्योगाचे उद्घाटन करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. यामुळे मूल्यवर्धनाला मदत मिळेल आणि निर्यातीसाठी राज्य अधिक सज्ज होईल..जीआय मानांकन लाकाडोंग हळद मेघालयातील जीआय मानांकन प्राप्त लाकाडोंग हळद प्रसिद्ध आहे. या हळदीत कर्क्युमिन घटकाचे प्रमाण ७ ते १२ टक्के असते, जे पारंपरिक हळदीच्या वाणांपेक्षा लक्षणीयरीत्या अधिक आहे. ‘लाकाडोंग मिशन’अंतर्गत या हळदीची २,१९० हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आली आहे. याला २० हून अधिक प्रक्रिया उद्योगांकडून साहाय्य मिळत असून, याचा १३ हजारांहून अधिक शेतकऱ्यांना फायदा होत आहे.आले आणि काळी मिरीच्या उत्पादनातही काही प्रमाणात वाढ झाली आहे. २०२२ ते २०२५ दरम्यानच्या कालावधीत देशांतर्गत तसेच निर्यात बाजारांत मिळून ४२० मेट्रिक टनांहून अधिक मसाल्यांचा व्यापार करण्यात आला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.