Amaravati News : मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यात १९ ऑगस्टला अति मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे मध्य प्रदेशमधून उगम असणाऱ्या मेघा नदीला मोठा महापूर आला. या महापुराचे पाणी शिरजगावातील आठवडी बाजार, चुनारपुरा, धाकडेपुरा या भागातील अनेक घरांसह दुकाने तसेच शेतात शिरले. त्यामुळे ५० लाखांवर नुकसान झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. .२००७ नंतर पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात मेघा नदीला महापूर आला आहे. पुराची व्यापकता पाहता महसूल तसेच पोलिस प्रशासनाने नदीकाठी राहणाऱ्या लोकांना सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे जीवितहानी झाली नाही. परंतु पुराचे पाणी शिरजगावकसबा गावातील १९ घरे, ३६ दुकाने, अंगणवाडी केंद्र, शासकीय कार्यालये तसेच अनेक शेतात शिरल्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. .Maharashtra Flood Situation: सहा जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती कायम; नद्यांचे पाणी शेतात शिरल्याने नुकसान.दुसऱ्या दिवशी पुराच्या पाण्याची तीव्रता कमी झाल्यावर महसूल, तलाठी कार्यालय यांनी नुकसानीचे पंचनामे चांदूरबाजार तहसीलदारांच्या मार्गदर्शनात करण्यास सुरुवात केली असून नुकसानग्रस्तांच्या दिलेल्या पंचनाम्याच्या माहितीवरून ५० लाख रुपयांवर आर्थिक नुकसान झाल्याची माहिती महसूल मंडल अधिकारी परवेज पठाण यांन दिली. .Pandharpur Flood : पंढरपुरात पूरस्थिती; प्रशासन सतर्क.आठवडे बाजार परिसरातील महसूल तलाठी कार्यालय पुराच्या पाण्याने पूर्णपणे वेढलेले होते. त्यामुळे संगणक प्रणाली, कागदपत्रे, दस्तावेज भिजले. गावाला मेघा नदीवरील जोडणारा धाकडेपुरा येथील लहान पूल पूर्णपणे पुराच्या पाण्याखाली आला होता तर शिरजगाव ते ब्राह्मणवाडाथडी या राज्य महामार्गावरील मोठ्या पुलावर पुराचे पाणी वाहत असल्याने दोन्ही बाजूंना वाहतूक पूर्णपणे बंद होती..गावातील मेघा नदीवर असणाऱ्या मोठ्या पुलाचे सुरक्षाकठडे महापुराच्या पाण्यामुळे वाहून गेले आहेत.गावातील नुकसानीचा आढावा घेण्याकरिता अचलपूरचे आमदार प्रवीण तायडे तसेच पंचायत समिती चांदूरबाजारचे गटविकास अधिकारी श्री. वानखडे, चांदूरबाजार सार्वजनिक बांधकाम उपविभाग संबंधित अधिकारी यांनी मुख्य मार्गावरील मेघा नदीवरील पुलाची पाहणी केली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.