Jalana News: गुलाबी बोंड अळीमुळे कापूस पिकाची प्रत खराब होऊन उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होते. गुलाबी बोंड अळी व्यवस्थापनासाठी कीटक मिलन व्यत्यय तंत्रज्ञान फायद्याचे, असल्याचे मत राष्ट्रीय एकात्मिक कीड व्यवस्थापन संशोधन संस्था, नवी दिल्ली येथील शास्त्रज्ञ व प्रकल्प प्रमुख डॉ. अजंता बिराह यांनी व्यक्त केले. .राष्ट्रीय एकात्मिक कीड व्यवस्थापन संशोधन संस्था, नवी दिल्ली व कृषी विज्ञान केंद्र, खरपुडी जालना यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या कापूस एकात्मिक कीड व्यवस्थापन प्रकल्पाअंतर्गत क्षेत्रीय भेटीदरम्यान शेतकऱ्यांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या..Cotton Pink Bollworm : गुलाबी बोंड अळी नियंत्रणाची प्रभावी रणनीती.या क्षेत्रीय भेटीत त्यांनी सावरगाव हडप आणि वानडगाव (ता. जालना) येथील प्रात्यक्षिक प्लॉटला भेटी दिल्या. या प्रसंगी कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. एस. व्ही. सोनुने, कीटक शास्त्रज्ञ प्रा. अजय मिटकरी सावरगाव हडप येथील प्रगतशील शेतकरी उद्यान पंडित भगवानराव डोंगरे, वानडगाव येथील सौ. विजयमाला विठ्ठलराव नागवे यांची प्रमुख उपस्थिती होती..डॉ. बिराह म्हणाल्या, की कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे अनेक समस्या वाढत आहेत. त्याचबरोबर शेतीमधील खर्च वाढतो तसेच मानवी आरोग्यावरही दुष्परिणाम होतात. एकाच कीटकनाशकाचा सातत्याने अति वापर केल्यामुळे किडींमध्ये  त्या कीटकनाशकाप्रति प्रतिकारशक्ती निर्माण होते. परिणामी किडींचे अपेक्षित नियंत्रण होत नाही..BT Cotton Pink Bollworm: बीटी कापसातील गुलाबी बोंड अळीचं व्यवस्थापन कसं करावं?.याशिवाय रासायनिक कीटकनाशकांचा मानवी स्वास्थ्य, वातावरणातील पक्षी व नैसर्गिक मित्र कीटक यावर देखील परिणाम होतो. यासाठीच पर्यावरण पूरक एकात्मिक कीड व्यवस्थापन प्रणालीचा अवलंब करणे काळाची गरज आहे, असेही डॉ. बिराह म्हणाल्या. .डॉ. एस. व्ही. सोनुने यांनी शेतकऱ्यांना वातावरण बदलानुसार शेती करण्याचे आवाहन केले. त्यांनी शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीने खचून न जाता रब्बी हंगामासाठी सज्ज व्हा असे आवाहन केले. याप्रसंगी शेतकऱ्यांना नवीन पीक वाणांचा वापर करण्याचे आवाहन केले..प्रा.अजय मिटकरी यांनी सघन कापूस लागवड याबद्दल माहिती दिली. सघन पद्धतीने कापूस लागवड केल्यास उत्पादनात वाढ मिळते, असे सांगितले व कीटक मिलन व्यत्यय तंत्रज्ञान प्रकल्पाबाबत माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुराग काळे यांनी केले तर आभार तुषार थिटे यांनी मानले. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.