Raigad News: कर्जत-नेरळ रस्त्यालगत असलेल्या माणगावतर्फे वरेडी गावच्या हद्दीतील राबीया बकरी फार्मला रविवारी (ता. २५) मध्यरात्री भीषण आग लागली. या आगीत फार्ममधील अंदाजे ३०० ते ४०० बकऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला. या घटनेत कोणतीही मनुष्यहानी झाली नसली तरी, व्यावसायिकाचे सुमारे एक कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे..मुंबई येथील तालिब सय्यद अशरफ अली यांच्या मालकीचे राबीया फार्म आहे. मध्यरात्रीच्या सुमारास फार्म परिसरातून अचानक धुराचे लोट आणि आगीच्या ज्वाळा दिसू लागल्या..Goat Farming: मामा, भाच्याचे किफायतशीर शेळीपालन.काही क्षणांतच आगीने रौद्र रूप धारण केले आणि बकरी पालनासाठी उभारलेल्या शेड्स आगीच्या विळख्यात सापडल्या. आगीची तीव्रता इतकी होती की, बकऱ्यांना बाहेर काढण्याची संधीही मिळाली नाही. या आगीमुळे व्यावसायिकाचे मोठे नुकसान झाले आहे..Goat Farming: जातिवंत शेळ्या, बोकडांच्या पैदाशीवर भर.शॉर्टसर्किटचा प्राथमिक अंदाजआग ही विद्युतवाहिन्यांमधील बिघाडामुळे म्हणजेच शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. आगीची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होत शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले..घटनेनंतर महसूल व पशुसंवर्धन विभागाकडून पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, नुकसानभरपाईची मागणी करण्यात येत आहे. घटनास्थळी नेरळ पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक राहुल वरोटे यांनी आपल्या पथकासह धाव घेत आवश्यक कार्यवाही केली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.