Massajog VillageAgrowon
ॲग्रो विशेष
Massajog Village: मस्साजोग गावच्या सरपंचांचा दिल्लीत गौरव; जलसंधारणाच्या कामाची दखल
Water Conservation: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाने जलसंधारणाच्या उल्लेखनीय कार्यामुळे देशभरात नावलौकिक मिळवला आहे. दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या स्वप्नातून सुरू झालेल्या या मोहिमेला गावकऱ्यांच्या श्रमदानाने आणि नाम फाउंडेशनच्या सहाय्याने नवे यश मिळाले असून, केंद्र सरकारने या प्रयत्नांची दखल घेत दिल्लीत विशेष सन्मान दिला आहे.