Nashik News : लोकनेते ए. टी. पवार कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आमदार नितीन पवार यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळाच्या कार्यकाळात आर्थिक वर्षात ६ कोटी ७ लाख ९० हजार विक्रमी उत्पन्न झाले. खर्च वजा जाता ३ कोटी ५० लाख ५५ हजार ५३६ रुपयांचा नफा झाल्याची माहिती बाजार समितीचे सभापती धनंजय पवार यांनी दिली..बाजार समितीच्या २२ व्या सर्वसाधारण सभेत बोलताना अध्यक्षपदाहून बोलताना सभापती धनंजय पवार यांनी ही माहिती दिली. व्यासपीठावर उपसभापती बाळासाहेब वराडे, यशवंत गवळी, सोमनाथ पवार, बाळासाहेब गांगुर्डे, सुधाकर खैरनार, शितलकुमार आहिरे, योगेश महाजन, योगेश शिंदे, प्रवीण देशमुख, ज्ञानदेव पवार, दिलीप कुवर, पंढरीनाथ बागूल, प्रवीण देशमुख, भरत पाटील, दत्तू गायकवाड, शशिकांत पवार, सुनीता जाधव, रेखा गायकवाड आदी संचालक उपस्थित होते..APMC Farmer Facility : शेतीमाल आणणाऱ्या शेतकऱ्यांना मोफत जेवणाचे पास ः सूर्यकांत पाटील.पवार म्हणाले, की बाजार समितीला आर्थिक वर्षात विक्रमी नफा झाला.संचालक मंडळाने खर्चात काटकसर केली. योग्य नियोजनाद्वारे व्यावहारिक दृष्टिकोनातून कामकाज करताना शेतकरी, व्यापारी व कामगार यांना केंद्रबिंदू मानून सुविधा उपलब्ध दिल्या..उपबाजार आवार नाकोडा येथे लिलाव शेड, यार्ड डांबरीकरण, टॉयलेट ब्लॉक काम करण्यात आले, अभोणा उपबाजारात हायमास्ट, नाकोडा व अभोणा सीसीटीव्ही कॅमेरे बसविले. कनाशी येथे नवीन आवारात भुईकाटा व कार्यालय, लिलाव शेड उभे करण्यात येणार आहे..Pune APMC: पुणे बाजार समिती गैरव्यवहारांबाबत कागदी घोडे नाचविण्याचा खेळ.सचिव रवींद्र हिरे यांनी इतिवृत्त अहवाल वाचन केले. विलास रौदळ यांनी शासनाने कांदा निर्यात बंदी उठवावी. विक्री झालेल्या कांदावर अनुदान देण्यात यावे, असा ठराव मांडला.सभासदांनी पाठिंबा देत ठराव संमत केला. .जिल्हा फेडरेशनचे संचालक रोहित पगार, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, धीरेनकुमार पगार, संभाजी पवार, उपनगराध्यक्ष बाळासाहेब जाधव, विलास रौंदळ, विष्णू बोरसे, नगरसेवक राहुल पगार, सुनील महाले, राजेंद्र आहेर, शिवा जाधव, मधुकर वाघ, हरिभाऊ पगार, विलास गवळी, भाजपचे तालुकाध्यक्ष दीपक खैरनार, चेतन निकम, अभिमन गुंजाळ, कैलास रौंदळ, सुनील जाधव आदींसह सदस्य उपस्थित होते..यापूर्वीचा उच्चांकी विक्रम पाच वर्षानंतर मोडीतमागील वर्षात कांद्याच्या दरात सुधारणा असल्याने वार्षिक उलाढाल वाढले आहे. त्यामुळे बाजार समितीच्या उत्पन्नात देखील वाट दिसून आली. यापूर्वी बाजार समिती स्थापनेपासून २०२९-२० या आर्थिक वर्षात उच्चांकी ४ कोटी ५९ लाख रुपयांची उलाढाल नोंदविली गेली होती. त्यावेळी नफा २ कोटी ६० लाख इतका खर्च वजा जाता नफा मिळाला होता. तर यावर्षी हा विक्रम मोडीत निघाला आहे, अशी माहिती बाजार समितीचे सचिव रवींद्र हिरे यांनी दिली..दृष्टिक्षेपात बाजार समितीमुख्य बाजार कळवणउपबाजार नाकोडे, अभोणा, कनाशीव्यापारी १५०मापारी ३२हमाल ८०कार्यक्षेत्रातीलएकूण गावे १५२सहकारी सोसायटी ४३ग्रामपंचायत ८७.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.