Nanded News: सण, उत्सव, विवाह सोहळ्यासह कोणतेही मंगलकार्य असो, फुलांशिवाय सोहळ्याची शोभा पूर्ण होत नाही. नांदेड जिल्ह्यातील मुदखेड आणि अर्धापूर तालुक्यांनी आपल्या सुगंधी आणि रंगीबेरंगी फुलांच्या जोरावर आज ‘फुलांचे आगार’ म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. .मुदखेडच्या काळ्या मातीत शेतकऱ्यांच्या घामातून फुललेले हे ‘पिवळे सोने’ आता केवळ जिल्ह्यापुरते मर्यादित न राहता तेलंगणा आणि आंध्र प्रदेशसारख्या शेजारील राज्यांतही आपला सुगंध दरवळत आहे..Marigold Flower Rate : परभणीत झेंडूला अपेक्षित दर न मिळाल्याने शेतकऱ्यांची निराशा .मुदखेड येथील फुलांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा गडद रंग आणि दीर्घकाळ टिकणारा ताजेपणा. यामुळेच स्थानिक बाजारपेठेसोबतच परराज्यातील बाजारपेठांमध्ये या फुलांना मोठी पसंती मिळत आहे. तेलंगणातील हैदराबाद, निजामाबाद, करीमनगर तसेच.Marigold Flower: झेंडूच्या फुलांची आवक बाजारात वाढली.महाराष्ट्रातील शिर्डी, अमरावती यांसारख्या प्रमुख शहरांमध्ये मुदखेडच्या फुलांना मोठी मागणी आहे. मुदखेडच्या या यशस्वीपॅटर्नमुळे परिसरातील इतर तरुण शेतकरीही आता मोठ्या प्रमाणावर फुलशेतीकडे आकर्षित होत आहेत..आम्ही काकडा, गलांडा, गुलाब, शेवंती आणि झेंडू अशा विविध फुलांची जोपासना करतो. सध्या पौष महिना असल्याने विवाह सोहळे कमी आहेत, त्यामुळे मागणी काहीशी मंदावली. मात्र, येत्या काही दिवसांत लग्नसराई सुरू होताच फुलांच्या मागणीत आणि दरात मोठी वाढ होईल अशी आशा आहे.-इम्रान खान गफार खान पठाण, फूल उत्पादक शेतकरी, शेंबोली, ता. मुदखेड.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.