Admin Work: मार्च महिना संपायला आता अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने जिल्ह्याच्या प्रशासकीय वर्तुळात धावपळ सुरू आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद आणि नगरपालिकांमधील विविध विभागांना मिळालेला विकास निधी ३१ मार्चपूर्वी खर्च करण्याचे मोठे आव्हान यंत्रणेसमोर उभे ठाकले आहे. हा निधी वेळेत खर्ची पडला नाही तर तो शासनाकडे परत जाण्याची भीती असल्याने, सध्या अधिकारी आणि कर्मचारी रात्रीचा दिवस करीत असल्याचे चित्र आहे..जिल्ह्यातील रस्ते, पाणीपुरवठा योजना, शिक्षण आणि आरोग्य सुविधांसाठी शासनाकडून मोठा निधी प्राप्त झाला होता; मात्र, अनेक तांत्रिक कारणांमुळे किंवा निविदा प्रक्रियेतील विलंबामुळे बराचसा निधी अद्याप पडून आहे. आता शेवटच्या आठवड्यात हा निधी नियोजित दाखवण्यासाठी देयके मंजूर करण्याची लगबग सुरू आहे. जिल्हा परिषदेच्या बांधकाम आणि समाजकल्याण विभागात सर्वाधिक वर्दळ पाहायला मिळत आहे..Long March: राजूरहून कष्टकऱ्यांच्या ‘लाँग मार्च’ला सुरुवात.मिळालेला प्रत्येक रुपया जिल्ह्याच्या विकासासाठी खर्च व्हावा, यादृष्टीने सर्व विभागांना सूचना दिल्या आहेत. तांत्रिक अडचणी दूर करून ३१ मार्चपर्यंत जास्तीत जास्त निधी खर्ची पडेल, याची काळजी घेतली जात आहे, अशी माहिती एका प्रशासकीय अधिकाऱ्याने नाव न देण्याच्या अटीवर दिली..Kisan Sabha Long March: शेतकरी-कामगारांच्या मागण्यांसाठी किसान सभेचे लाल वादळ अहिल्यानगरला धडकणार!.ठेकेदारांची ‘फिल्डिंग’वर्षभर केलेल्या कामांचे पैसे पदरात पाडून घेण्यासाठी ठेकेदारांनी आता शासकीय कार्यालयांमध्ये ठाण मांडले आहे. मार्चअखेर असल्याने बिले वेळेत ट्रेझरीत सादर व्हावीत, यासाठी ठेकेदारांकडून कर्मचाऱ्यांकडे सतत पाठपुरावा केला जात आहे. फाइल्सचा डोंगर उपसताना कर्मचाऱ्यांचीही दमछाक होत असून सुटीच्या दिवशीही कामे सुरू ठेवण्याची वेळ त्यांच्यावर येणार आहे..विविध विभागांच्या प्रमुखांसोबत बैठका घेण्यात येत आहेत. त्यांना प्रलंबित कामे पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात येत आहेत. त्यासाठी सातत्याने आढावा घेतला जात आहे. राज्य तसेच केंद्र शासनाचा विविध योजना, कामांसाठीचा मंजूर निधी पारदर्शकपणे खर्च करण्याचा प्रयत्न सुरू आहे.- डाॅ. मैनांक घोष, मुख्य कार्यकारी अधिकारी.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.