Chh. Sambhajinagar News : मराठवाड्यातील लिंबूवर्गीय खास करून मोसंबी फळ पिकांसाठी महत्त्वाचा असलेला सिट्रस इस्टेट प्रकल्प इसारवाडी (ता. पैठण) येथे आकार घेतो आहे. प्रकल्पाची काही कामे अंतिम टप्प्यात तर काही कामे प्रगतिपथावर आहे. मार्च २०२६ अखेर प्रकल्प पूर्ण कार्यक्षमतेने शेतकऱ्यांच्या सेवेत उतरण्याची आशा आहे..मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यामध्ये मोसंबी फळपिकाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. शेतकऱ्यांसाठी किफायतशीर असलेल्या मोसंबी तसेच लिंबूवर्गीय फळपिकासाठी तत्कालीन फलोत्पादन व रोहयो मंत्री संदीपान भुमरे पाटील यांच्या पुढाकारातून पैठण तालुक्यातील इसारवाडी येथे सिट्रस इस्टेटची स्थापना झाली..Citrus Estate : ‘सिट्रस इस्टेट’करिता मागितल्या सूचना .सिट्रस इस्टेट प्रक्षेत्रावर शेतकऱ्यांसाठी इंडो-इस्राईल तंत्रज्ञानाचा वापर करून जातिवंत रोपे निर्मिती करणे, शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देणे, वाजवी दरात कृषी निविष्ठा व अवजारे बँक द्वारा सुविधा उपलब्ध करून देणे इत्यादी बाबी राबवायच्या आहे..त्यासाठी प्रकल्प प्रक्षेत्रावर प्रशासकीय इमारत, प्रशिक्षण केंद्र, प्रयोगशाळा, कर्मचारी निवासस्थान, अवजारे शेड, गोडाऊन, कोल्डस्टोरेज, संरक्षक भिंत व शेतकरी निवासस्थान आदींमधील बहुतांश कामे कामे अंतिम टप्प्यात तर काही प्रगतिपथावर आहेत. प्रकल्पाच्या प्रक्षेत्रावर शेतकऱ्यांना जातिवंत कलमे रोपे पुरवठा करण्यासाठी काही मातृवृक्ष रोपे इंडो-इस्राईल पद्धतीने काही लागवड केली. येत्या मार्च अखेरपर्यंत विविध प्रात्यक्षिक प्लॉटची व मातृवृक्षाची लागवड करण्यात येणार आहे..फलोत्पादन संचालकांनी केली पाहणीराज्याचे फलोत्पादन संचालक अंकुशराव माने यांनी प्रकल्पावर चालू असलेल्या विविध बांधकामे, रोपवाटिका व जमीन विकास कामे इत्यादी कामांची नुकतीच पाहणी केली. प्रकल्पाच्या प्रभावी अंमलबजावणी व शाश्वत विकासासाठी शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने आवश्यक काही बदल करण्याबाबत मार्गदर्शन केले. प्रकल्प ३१ डिसेंबर २०२५ अखेरपर्यंत पूर्ण करण्याबाबत त्यांनी सूचित केले. याप्रसंगी कृषी आयुक्तालयातील कृषी उपसंचालक भागवतराव शिंगाडे,सिट्रस इस्टेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामनाथ कार्ले, पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार प्राप्त वसंतराव कातबने व इतर प्रगतिशील शेतकरी उपस्थित होते..Citrus Estate : वसंतदादा इन्स्ट्यिूटच्या धर्तीवर ‘सिट्रस इस्टेट’चे हवे कार्यान्वयन.काही नव्या बाबींचा समावेशप्रकल्पासाठी मंजूर असलेला एकूण ३९ कोटी ५५ लाख ६३ हजार रुपये निधी प्राप्त झाला. प्रकल्पात शासन निर्णयात मंजूर नसलेल्या परंतु प्रक्षेत्रावर काही घटक राबविणे अत्यावश्यक असलेल्या ठिबक ऑटोमेशन, सोलरायझेशन प्लॅटफॉर्म, आणि ऑटोमेशन शेड, शेडनेट व पॉलिहाऊस, सर्व इमारतीवर सौर ऊर्जा युनिट, फर्निचर, रस्त्यांच्या दुतर्फा आंबा, जांभूळ, नारळ, चिंच लागवड इत्यादी बाबींचा नव्याने समावेश करण्यात आला. त्यास शासनाची मंजुरी मिळताच मार्च २०२६ अखेर पर्यंत प्रकल्प पूर्णपणे कार्यान्वित करण्यात येणार आहे, असल्याचे प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामनाथ कारले यांनी स्पष्ट केले..अशी आहे रचनासिट्रस इस्टेट प्रकल्पाचे एकूण प्रक्षेत्र ५५ एकर असून त्यापैकी चार एकर क्षेत्रावर मातृवृक्ष लागवड व सहा एकर क्षेत्रावर मोसंबीचे विविध प्रात्यक्षिक घेण्यात येणार आहे. प्रकल्पावर इंडो इस्राईल पद्धतीने दरवर्षी अडीच लाख रोपे तयार करून शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत..सिट्रस इस्टेट प्रकल्पामध्ये अत्याधुनिक प्रशिक्षणाची सोय मोसंबी उत्पादक शेतकरी यांना मिळणार आहे. यातून मिळणाऱ्या शास्त्रोक्त ज्ञानातून शेतकऱ्यांच्या उत्पादनात भरीव वाढ अपेक्षीत आहे.-प्रकाश देशमुख, विभागीय कृषी सहसंचालक, छत्रपती संभाजीनगर.प्रकल्पाचे काम प्रगतिपथावर असून बांधकाम डिसेंबर २०२५ अखेरपर्यंत व इतर बाबी मार्च २०२६ अखेर पूर्ण होणार आहे. सिट्रस इस्टेट प्रकल्प मराठवाड्यातील मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना वरदान ठरेल.रामनाथ कार्ले, मुख्य कार्यकारी अधिकारी, सिट्रस इस्टेट..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.