Rural Water Shortage: मराठवाड्यातील ८९४ लघु, मध्यम व मोठ्या प्रकल्पांसह बंधाऱ्यांमधील उपयुक्त पाणीसाठा ३५.५६ टक्क्यांवर आला आहे. उपलब्ध उपयुक्त पाणीसाठ्यामध्ये मराठवाड्यातील ११ मोठ्या प्रकल्पांतील ४२.३६ टक्के, ७५ मध्यम प्रकल्पांतील २७.७५ टक्के, ७५८ लघु प्रकल्पांतील १९.८३ टक्के, गोदावरी नदीवरील १५ बंधाऱ्यांतील ३३.६७ टक्के, तर तेरणा, मांजरा आणि रेणा नदीवरील ३५ बंधाऱ्यांतील २१.९० टक्के उपयुक्त पाणीसाठ्याचा समावेश आहे..जायकवाडीत ३८ टक्के उपयुक्त पाणीमराठवाड्यातील सर्वात मोठ्या जायकवाडी प्रकल्पात सध्या ३८ टक्के उपयुक्त पाणी शिल्लक आहे. दुसरीकडे सिद्धेश्वर प्रकल्पात उपयुक्त पाण्याचा थेंबही शिल्लक नाही. मोठ्या प्रकल्पांपैकी सीना-कोळेगाव आणि निम्न दुधना प्रकल्पांमध्ये सुमारे ३५ टक्के उपयुक्त पाणी आहे. विष्णुपुरी प्रकल्पात ५३ टक्के, निम्न मनारमध्ये ४४ टक्के, निम्न तेरणा प्रकल्पात ५९ टक्के, .Water Scarcity: सांगलीत खानापूर तालुक्यात सहा गावांत पाणीटंचाई.उद्धव पैनगंगा प्रकल्पात ५० टक्के, मांजरा प्रकल्पात २६ टक्के, तर माजलगाव प्रकल्पात ३० टक्के उपयुक्त पाणी शिल्लक असल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली. गतवर्षी याच कालावधीत मराठवाड्यातील सर्व ११ मोठ्या प्रकल्पांमध्ये सुमारे ३४ टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध होता..Water Scarcity: पुणे जिल्ह्यात पाण्याचे स्रोत आटल्याने ९१ टँकरद्वारे पाणीपुरवठा.हिंगोली जिल्ह्यातील लघु प्रकल्पांत सर्वात कमी पाणीमराठवाड्यातील ७५८ लघु प्रकल्पांपैकी हिंगोली जिल्ह्यातील ३० प्रकल्पांमध्ये सर्वात कमी, केवळ ५ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. परभणी जिल्ह्यातील २२ प्रकल्पांत १८ टक्के, नांदेड जिल्ह्यातील ८० प्रकल्पांत २६ टक्के, धाराशिव जिल्ह्यातील २०६ प्रकल्पांत २० टक्के, लातूर जिल्ह्यातील १३५ प्रकल्पांत २४ टक्के, बीड जिल्ह्यातील १२६ प्रकल्पांत १४ टक्के, जालना जिल्ह्यातील ६० प्रकल्पांत १९ टक्के, तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ९९ प्रकल्पांत केवळ २० टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे..परभणीतील मध्यम प्रकल्पांत सर्वात कमी पाणीपरभणी जिल्ह्यातील दोन मध्यम प्रकल्पांत सर्वात कमी, म्हणजे १९ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. दुसरीकडे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील १६ मध्यम प्रकल्पांत ३२ टक्के, जालना जिल्ह्यातील ७ प्रकल्पांत ३९ टक्के, बीड जिल्ह्यातील १६ प्रकल्पांत २८ टक्के, लातूर जिल्ह्यातील ८ प्रकल्पांत २४ टक्के, धाराशिव जिल्ह्यातील १७ प्रकल्पांत २० टक्के, तर नांदेड जिल्ह्यातील ९ प्रकल्पांत ३२ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे..एकोणीस लघु प्रकल्प कोरडेमराठवाड्यातील ७५८ लघु प्रकल्पांपैकी १९ प्रकल्प पूर्णपणे कोरडे पडले आहेत. यामध्ये जालना जिल्ह्यातील २, बीडमधील १, धाराशिवमधील सर्वाधिक ११, तर हिंगोली जिल्ह्यातील ५ लघु प्रकल्पांचा समावेश आहे. याशिवाय १७३ लघु प्रकल्पांतील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमधील ५, जालन्यातील १४, बीडमधील ५५, लातूरमधील ८, धाराशिवमधील ५०, नांदेडमधील १९, परभणीतील ७, तर हिंगोलीतील १५ लघु प्रकल्पांचा समावेश आहे. मध्यम प्रकल्पांतील पाणीसाठाही जोत्याखाली गेला असून, त्यामध्ये बीडमधील ३, तर नांदेड, धाराशिव आणि लातूरमधील प्रत्येकी एका मध्यम प्रकल्पाचा समावेश असल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.