Hailstorm Crop Damage: मराठवाड्यात सोमवारी (ता. ३०) सायंकाळपासून रात्री उशिरापर्यंत अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड जिल्ह्यांत वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि गारपिटीमुळे मोठे नुकसान झाले. अनेक ठिकाणी काढणीला आलेल्या पिकांना फटका बसला असून वीज कोसळण्याच्या घटनांमध्ये जीवितहानीही झाली आहे..छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. ढोरकीन, लोहगाव, बालानगर (ता. पैठण), कायगाव, अंभई, जायकवाडी परिसर, पाचोड, चापानेर (ता. कन्नड), आळंद, कुरणपिंपरी आदी भागांत पाऊस व गारपीट झाली..Unseasonal Rain Impact: रब्बी पिके, फळपिकांना पाऊस, गारपिटीचा फटका.अंभई येथे दुपारी साडेतीनपासून सुरू झालेल्या पावसाने पुढे जोर धरत सुमारे अर्धा तास मुसळधार स्वरूप धारण केले. दोन-तीन मिनिटे गारपीट झाल्याने गहू, कांदा बी व भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले. याचदरम्यान वीज कोसळून शेतकरी नितीन मुंढे यांची सात महिन्यांची गाभण म्हैस मृत्युमुखी पडली..Unseasonal Rain: 'अवकाळी'सह गारपिटीचा तडाखा सुरुच, पुण्यासह उत्तर महाराष्ट्राला झोडपले, कांदा, गहू पिकाचे नुकसान, शेतकरी चिंतेत.जालना जिल्ह्यातील किनगाव, नांदी, रोहिलागड, धनगर पिंपळगाव, गोंदी, जाफराबाद, भोकरदन, अंबड, मंठा परिसरात वादळी वाऱ्यासह गारपीट व जोरदार पाऊस झाला..या पावसामुळे गहू, ज्वारी, हरभरा, उन्हाळी बाजरी, बीज कांदा तसेच टरबूज व आंबा पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.बीड जिल्ह्यातील टाकरवण, धारूर, बर्दापूर, अंबाजोगाई, घाटनांदूर परिसरात विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पावसाची नोंद झाली. काही ठिकाणी रिमझिम तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला..वीज कोसळून दोघांचा मृत्यूअंबड तालुक्यातील महाकाळा येथे नाथनगरवस्ती जवळ पावसापासून बचावासाठी झाडाखाली थांबलेल्या तिघांवर वीज कोसळली. यात गोविंद प्रल्हाद लहाने (वय २१) व महादेव दगडू बेद्रे (वय २०) यांचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.