Chh. Sambhajinagar News : मराठवाड्यातील आठही जिल्ह्या़ंतील ४८० मंडलांपैकी तब्बल ९२ मंडलांत अजूनही आजवर अपेक्षित पाऊस झाला नसल्याची स्थिती आहे. मंडलांप्रमाणेच तब्बल आठ तालुक्यात हीच स्थिती असल्याचे पावसाची टक्केवारी सांगते. त्यामुळे यंदा पुन्हा एकदा पावसाचा लहरीपणा चर्चेत आला आहे..मराठवाड्यातील ७६ तालुक्यांपैकी छत्रपती संभाजीनगर, आष्टी, लातूर, परभणी, गंगाखेड, सेलू, सोनपेठ, मानवत या तालुक्यात एक जूनपासून आतापर्यंत अपेक्षित पावसाच्या तुलनेत पाऊस झाला नसण्याची स्थिती आहे. त्यातही बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात पावसाचा टक्का तुलनेने सर्वात कमी आहे..Marathwada Rainfall : मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांतील पावसाचा जोर झाला कमी.दुसरीकडे मराठवाड्यातील एकूण ४८० मंडलांपैकी तब्बल ९२ मंडलांत पावसाचा टक्का अपेक्षेच्या तुलनेत कमी असल्याची स्थिती आहे. पावसाचा टक्कर कमी असलेल्या मंडळांमध्ये छत्रपती संभाजीनगर मधील २०, जालन्यातील ६, बीडमधील १२, लातूरमध्ये १७, धाराशिवमधील ४, नांदेडमधील ५, परभणीमधील २५, तर हिंगोलीतील तीन मंडळांचा समावेश आहे..याशिवाय पावसाळा उत्तरार्धाकडे असताना वार्षिक सरासरी पावसाच्या तुलनेत १४ तालुक्यात कमी पाऊस असल्याची स्थिती आहे. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील आष्टी मंडळात आजवरच्या अपेक्षित पावसाच्या तुलनेत सर्वात कमी ५७.८ टक्केच पाऊस झाला आहे. .Parbhani Rainfall : परभणी, हिंगोली जिल्ह्यांत पावसाचा जोर कायम.याच तालुक्यातील दौलावडगाव मंडळात ६३.५टक्के, धामणगाव मंडळात ७५.९ टक्के, धानोरा मंडलांत ७८.४ टक्के,टाकळसिंग मंडलांत ७६.७ टक्के, पिंपळा मंडलांत ७६.६ टक्केच पाऊस झाला आहे..जिल्हानिहाय पावसाअभावी प्रभावित मंडळेजिल्हा कमी पावसाचे मंडळेछत्रपतीसंभाजीनगर २०जालना ६बीड १२लातूर १७धाराशिव ४ नांदेड ५परभणी २५हिंगोली ३कमी पावसाचे तालुके : छत्रपती संभाजीनगर, आष्टी (बीड जिल्हा), लातूर, परभणी, गंगाखेड, सेलू, सोनपेठ.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.