Agriculture Department Planning: महसूल विभागासाठी खरीप हंगाम २०२६ मध्ये ४९.४८ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. या हंगामासाठी शासनाकडे १७.११ लाख टन खतांची मागणी नोंदवण्यात आली असून, त्यापैकी १४.७३ लाख टन खतांचे पुरवठा मंजूर झाले आहे..खरीप हंगाम २०२६ च्या पार्श्वभूमीवर विभागीय खरीप हंगामपूर्व बैठकीच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर महसूल विभागातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड व धाराशिव या जिल्ह्यांचा आढावा विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी नुकताच घेतला..Pre Kharif Planning Meeting: कणेरी येथे खरीप हंगामपूर्व नियोजन आढावा बैठक.यावेळी विभागीय कृषी सहसंचालक सुनील वानखेडे यांनी खत व बियाण्यांची उपलब्धता तसेच विविध योजनांद्वारे कृषी विभाग करत असलेल्या कामांचा सविस्तर आढावा सादरीकरणाद्वारे मांडला. त्यानुसार मागील रब्बी हंगामातील शिल्लक खतसाठा ७.१९ लाख टन असून, त्याचा विचार करता खरीप हंगामासाठी एकूण २१.९२ लाख टन खत उपलब्ध होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना बियाणे व खतांची कमतरता भासणार नाही, असे कृषी विभागाने स्पष्ट केले..Micro Planning: नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी सूक्ष्म नियोजन करा .दरम्यान, यंदा ‘एल निनो’च्या प्रभावामुळे कमी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर कोणत्याही कृषी निविष्ठा उत्पादक, वितरक व विक्रेत्यांनी सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून काळाबाजार, साठेबाजी, लिंकींग किंवा जादा दराने विक्री करू नये. अन्यथा संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा सक्त इशारा विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी दिला..एल निनोमुळे पावसात खंड पडणे, पावसाचे प्रमाण कमी होणे, पिकांच्या वाढीवर परिणाम होणे आणि पाणीटंचाई निर्माण होणे असे परिणाम संभवतात. त्यामुळे खरीप हंगामात शेतकऱ्यांनी योग्य नियोजन करणे आवश्यक आहे..खरीप नियोजन दृष्टीक्षेपातएकूण नियोजित पेरणी क्षेत्र : ४९.४८ लाख हेक्टरखतांची मागणी : १७.११ लाख टनमंजूर पुरवठा : १४.७३ लाख टनरब्बी शिल्लक साठा : ७.१९ लाख टनएकूण उपलब्धता : २१.९२ लाख टन.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.