Marathwada Agriculture Update: मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत २५ जूनअखेर सुमारे १ लाख ४० हजार ९२७ हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी झाली असल्याची माहिती कृषी विभागाच्या अहवालातून समोर आली आहे. ज्या भागांत समाधानकारक पाऊस झाला आहे, तेथे पेरणीला वेग आला असून, अनेक भागांत अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे..यंदाच्या खरीप हंगामासाठी मराठवाड्यात सुमारे ४९ लाख ७२ हजार ७२८ हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड या तीन जिल्ह्यांतील २१ लाख ४२ हजार २४ हेक्टर, तर लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी आणि हिंगोली या पाच जिल्ह्यांतील २८ लाख ३० हजार ७०५ हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे..Kharif Season: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मक्याचे अडीच लाख हेक्टर क्षेत्र प्रस्तावित.मात्र, मॉन्सूनच्या उशिरामुळे पेरणी वेळेत सुरू होऊ शकली नाही. गेल्या दोन दिवसांत अनेक भागांत पावसाने हजेरी लावल्यानंतर पेरणीला गती मिळू लागली आहे. कृषी विभागाच्या अहवालानुसार, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड या तीन जिल्ह्यांत १ लाख ३ हजार ९३ हेक्टर, तर लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी आणि हिंगोली या पाच जिल्ह्यांत ३७ हजार ८३४ हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी झाली आहे..Kharif Sowing Slow: मराठवाड्यात अवघ्या साडेआठ हजार हेक्टरवर पेरणी.सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत छत्रपती संभाजीनगर कृषी विभागातील तीन जिल्ह्यांत केवळ ५ टक्के, तर लातूर कृषी विभागातील पाच जिल्ह्यांत १ टक्का पेरणी झाली आहे..गतवर्षी याच कालावधीत छत्रपती संभाजीनगर कृषी विभागात सुमारे १६ टक्के, तर लातूर कृषी विभागात ४ टक्के पेरणी पूर्ण झाली होती. अद्यापही पावसाचे आगमन लहरी स्वरूपाचे असून अनेक भागांत दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.