Drought Stress: मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड या तीनही जिल्ह्यांत पावसाअभावी खरीप पिकाच्या नुकसानीची दाहकता सातत्याने वाढते आहे. या तीनही जिल्ह्यांत पेरणी झालेल्या १९.८८ लाख हेक्टर क्षेत्रापैकी आतापर्यंत सुमारे ७ लाख ३९ हजार हेक्टरवरील खरिपाच्या पिकांचे पावसाअभावी नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या अर्थकारणावर याचा मोठा आघात झाला आहे. पेरणी क्षेत्राच्या तुलनेत नुकसानीचे सरासरी क्षेत्र सुमारे ३७ टक्के आहे..या संदर्भात प्राथमिक माहितीनुसार, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात यंदा सुमारे ६ लाख ३४ हजार हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली. त्यापैकी सुमारे १ लाख १८ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. पेरणी झालेल्या क्षेत्राच्या तुलनेत हे प्रमाण सुमारे १९ टक्के आहे. जालना जिल्ह्यात ५ लाख ८५ हजार हेक्टरवर पेरणी झालेल्या क्षेत्रापैकी सुमारे २ लाख ६० हजार हेक्टरला अपुरा पाऊस, पावसाचा खंड यामुळे नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. पेरणी झालेल्या क्षेत्राच्या तुलनेत नुकसानीच्या क्षेत्राचे प्रमाण सुमारे ४४ टक्के आहे..Marathwada Rain Break: मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांत पिके ताणावर.बीड जिल्ह्यात यंदा सुमारे ७ लाख ६५ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. त्यापैकी सुमारे ३ लाख ६० हजार हेक्टरला जबर फटका बसला आहे. नुकसानीचे क्षेत्र हे सरासरी क्षेत्राच्या तुलनेत सुमारे ४७ टक्के इतके असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली..पावसाचा खंड सुरूचतीनही जिल्ह्यांत ऑगस्टमध्ये सरासरी १५१ मिलिमीटर पाऊस पडणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात केवळ ३५ मिलिमीटरच पाऊस झाला. त्यातही पावसाचे दिवस सरासरी दोन ते तीनच राहिले आहेत. सप्टेंबरमध्ये ५१ मिलिमीटर पाऊस अपेक्षित असताना आतापर्यंत केवळ ९.५० मिलिमीटर पाऊस झाला जो सरासरी पावसाच्या तुलनेत केवळ ११ टक्के आहे. पडलेला पाऊस गावांत पडला तर काही गावांत पडलाच नाही, असेही चित्र आहे. त्यामुळे दिवसेंदिवस नुकसानीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे..Rainfall Deficit: पावसाअभावी खरीप संकटात.निवेदनांचा ओघ वाढला, पंचनाम्यांची प्रतीक्षासातत्याने नुकसानीचे क्षेत्र वाढत असताना तीनही जिल्ह्यांतील शेतकरी, लोकप्रतिनिधी यांच्याकडून पंचनाम्यांसह नुकसान भरपाईच्या संदर्भात निवेदनांचा प्रशासनावर पाऊस पडतो आहे. परंतु अजूनपर्यंत शासनाकडून पंचनाम्यासंदर्भात कुठल्याही सूचना किंवा आदेश नसल्याची स्थिती आहे. अत्यल्प झालेला पाऊस आणि ३७-३८ दिवसांच्या खंड आहे. आता पाऊस न आल्यास नुकसानीचे क्षेत्र अधिक वाढण्याची चिन्ह आहेत..प्रदीर्घ पावसाच्या खंडामुळे पिकांच्या नुकसानीचे क्षेत्र वाढते आहे. आपत्कालीन परिस्थितीत तातडीच्या उपाययोजना सुचविणार आहोत. शक्य तिथे पिके वाचविण्याचा प्रयत्न कसा करता येईल या बाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. आपत्कालीन परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत.- सुनील वानखेडे, विभागीय कृषी सहसंचालक, छत्रपती संभाजीनगर.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.