Chh. Sambhajinagar News : मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड या तीन जिल्ह्यांतील २० लाख ८५ हजार ९३४ शेतकऱ्यांच्या १७ लाख ७७ हजार ८७४.७८ हेक्टर वरील शेती पिकांचे नुकसान झाले आहे. नैसर्गिक आपत्तीने यंदा खरिपाची दाणादाण केली आहे. जून ते सप्टेंबर दरम्यान सातत्याने पडणारा पाऊस शेती पिकांचे मोठे नुकसान करून गेला आहे. .अजूनही पावसाच्या अधून मधून आक्रमणाने उरल्या सुरल्या पिकांच्या आशाही संपण्याच्या मार्गावर आहेत. प्रशासनाच्या माहितीनुसार, सप्टेंबरमध्ये बीड जिल्ह्यातील सात लाख ९६ हजार ६७३ शेतकऱ्यांच्या सात लाख २१ हजार ७३.८७ हेक्टरवरील शेती पिकाचे नुकसान झाले आहे. .छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ६ लाख ८५ हजार ८७८ शेतकऱ्यांच्या ६ लाख ७ हजार ५१८.९१ हेक्टरवरील शेती पिकांना नैसर्गिक आपत्तीचा दणका बसला. तर जालना जिल्ह्यातील ६ लाख ३ हजार ३९३ शेतकऱ्यांच्या ४ लाख ४९ हजार २८२ हेक्टरवरील शेती पिकांची वाताहत झाली. शासनाच्या ९ ऑक्टोबरच्या निर्णयानुसार नुकसानीचे क्षेत्र व अपेक्षित निधीची माहिती प्रशासनाकडून शासनाला कळविण्यात आली आहे..Crop Damage : नांदेडमध्ये सप्टेंबरमध्ये ३२ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान.नुकसानभरपाईसाठी गरज १६२८ कोटीचीनुकसान भरपाईसाठी शासनाच्या नियमानुसार सुमारे १६२८ कोटी २४ लाख ५६ हजार ३०० रुपये ची गरज आहे. त्यामध्ये छत्रपती संभाजी नगर जिल्हा करता ५६१ कोटी ७९ लाख ६५ हजार ९९५ रुपये, जालना जिल्ह्यासाठी ४२१ कोटी ४१ लाख ४७ हजार २२५ रुपये तर बीड जिल्ह्यासाठी ६४५ कोटी तीन लाखांची गरज असल्याची माहिती सूत्रांनी दिली..Crop Damage Compensation : सप्टेंबरमधील पीकनुकसानीपोटी ६४ कोटी ६१ लाख रुपये निधी वितरणास मंजुरी .जिल्हानिहाय नुकसानछत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील सप्टेंबर मध्ये नुकसान झालेल्या ६ लाख ७ हजार ५१८.९१ हेक्टर क्षेत्रामध्ये पाच लाख ७१ हजार ७८ हेक्टरवरील जिरायत १० हजार २०२.४० हेक्टर वरील बागायत २६२३७.९९ हेक्टरवरील फळ पिकांचा समावेश आहे..जालना : जिल्ह्यातील सप्टेंबर मध्ये नुकसान झालेल्या चार लाख ४९ हजार २८२ हेक्टर क्षेत्र मध्ये ४ लाख २० हजार ५४९ हेक्टर जिरायत, १२७५ हेक्टर बागायत, तर २७ हजार ४५८ हेक्टर फळ पिकांच्या समावेश आहे.बीड : जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नुकसान झालेल्या ७ लाख २१ हजार ७३.८७ हेक्टर क्षेत्रामध्ये ६ लाख ९३ हजार ८१० हेक्टर वरील जिरायत १० हजार ९९४ हेक्टरवरील बागायत तर १६ हजार २६८.७६ हेक्टरवरील फळपिकाचा समावेश आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.