Monsoon Report: आजवर अनिश्चित राहिलेल्या पावसाने शुक्रवारी (ता. ३१) सकाळपर्यंतच्या २४ तासांत मराठवाड्यात जोरदार हजेरी लावत आठही जिल्ह्यांना अक्षरशः झोडपून काढले. विभागातील तब्बल पावसाच्या २३३ मंडलांत अतिवृष्टीची नोंद झाली. सर्वदूर झालेल्या दमदार पावसामुळे खरीप पिकांना मोठा दिलासा आहे. .नांदेड जिल्ह्यातील ७३ मंडलांत अतिवृष्टी झाली. माहूर, उमरी बाजार आणि मांडवा या तीन मंडलांत २२३ ते २५१.५० मिलिमीटर पावसाची नोंद झाली..Marathwada Rain Update : मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांतील १४३ मंडलांत हलका ते मध्यम पाऊस.परभणी जिल्ह्यातील ४८ पावसाच्या मंडलांत, जालना जिल्ह्यातील ३९, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ३३, हिंगोली जिल्ह्यातील ०२७, बीडमधील ६, लातूरमधील ४ आणि धाराशिव जिल्ह्यातील पावसाच्या ३ मंडलांत अतिवृष्टीची नोंद झाली. हिंगोली जिल्ह्यातील १५ मंडलांत १०५.७५ ते १७३ मिलिमीटर, जालन्यातील १० मंडलांत १०३ ते १५५ मिलिमीटर, तर छत्रपती संभाजीनगरमधील १२ मंडलांत १०३ ते १४१.७५ मिलिमीटर पाऊस झाला. शुक्रवारी दुपारपर्यंतही अनेक भागांत रिमझिम किंवा अधूनमधून जोरदार सरी सुरूच होत्या..Rain Update: छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड या जिल्ह्यांतील ८९ मंडलांत हलका- मध्यम पाऊस.बारा तालुक्यांत १०० मिलिमीटरहून अधिक पाऊसमराठवाड्यातील १२ तालुक्यांत सरासरी १०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला. त्यामध्ये सोयगाव (१२१.४), सिल्लोड (१२४.६), भोकरदन (१०७.९), जालना (१००.३), किनवट (१२९.२), मुदखेड (१०७.८), हिमायतनगर (१५५.९), माहूर (१८८.१), जिंतूर (१०९.१), हिंगोली (१४५), कळमनुरी (१०४.३) आणि औंढा (११०.८) या तालुक्यांचा समावेश आहे..पाच जिल्ह्यांत सरासरी ६० मिलिमीटरहून अधिक पाऊसमराठवाड्यातील आठ जिल्ह्यांपैकी छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, परभणी आणि हिंगोली या पाच जिल्ह्यांत सरासरी ६० मिलिमीटरहून अधिक पाऊस झाला. हिंगोली जिल्ह्यात सर्वाधिक १०३.९ मिलिमीटर सरासरी पावसाची नोंद झाली. लातूर जिल्ह्यात सरासरी ४५.२ मिलिमीटर, बीडमध्ये ४३.९ मिलिमीटर, तर धाराशिवमध्ये ३५.७ मिलिमीटर पाऊस झाला..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.