Chh. Sambhajinagar News : मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड या तीन जिल्ह्यांतील २१० मंडलांपैकी तब्बल १४३ मंडलांत रविवारी (ता. २८) सकाळपर्यंतच्या २४ तासात अतिवृष्टी झाली आहे. पावसाचा थैमान एवढं होतं की तीन जिल्ह्यातील २८ पैकी १६ तालुक्यात सरासरी अतिवृष्टी झाली. छत्रपती संभाजीनगर मधील पाच व जालन्यातील एका तालुक्यात सरासरी १०० मिलिमीटरच्या पुढे पाऊस झाला. त्यामुळे पुन्हा एकदा पूरस्थितीचे संकट अतिवृष्टी झालेल्या भागात निर्माण झाल्याची स्थिती आहे. शिवाय अति जास्त प्रमाणात झालेल्या या पावसामुळे शेती पिकाच्या नुकसानीतही वाढ होणार हे स्पष्ट आहे..छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ८४ पैकी तब्बल ६८ मंडलांत अतिवृष्टी झाली. धो धो वर असणाऱ्या पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातल्याने अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली. गंगापूर, वैजापूर, कन्नड, खुलताबाद, फुलंब्री, या तालुक्यात सरासरी १२०.३ ते १६९.८ मिलिमीटर दरम्यान पाऊस झाला. त्यामुळे नद्या दुथडी भरून तर ओढ्यांना पूर आला काही ठिकाणी छोटे मोठे तलाव फुटण्याच्या घटनाही घडल्या. जालना जिल्ह्यातील ४९ पैकी २६ मंडलांत अतिवृष्टी झाली जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात सरासरी १००.९ मिलिमीटर पाऊस झाला. घनसावंगी तालुक्यातही सरासरी ६८.७ मिलीमीटर इतकी अतिवृष्टी झाली. इतर तालुक्यात ४१.१ ते ५६.९ मिलिमीटर दरम्यान सरासरी पाऊस झाला. .Marathwada Ativrushti: मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे अभूतपूर्व नुकसान.अतिवृष्टीची मंडळ (पाऊस मिलिमीटरमध्ये)छत्रपती संभाजीनगर जिल्हाछत्रपती संभाजीनगर ८७.७५, उस्मानपुरा ९७.५०, भावसिंगपुरा ९९.५०, कांचनवाडी १४२.५०, चिकलठाणा ६६, चौका १००, पंढरपूर ८२.२५, पिसादेवी ६६.५०, वरुड काजी ६६.५०, आडुळ ८७, पैठण ६९.५०, पाचोड ६९.७५, गंगापूर १४८.५०, मांजरी १५१, भेंडाळा १५६.२५, शेंदूरवादा ९९.५०, तुर्काबाद १६५, वाळूज १२६.७५, हरसुल १९६.२५, डोणगाव १९३.२५, सिद्धनाथ वडगाव १५०.७५, आसेगाव ११८, गाजगाव १५०.७५, जामगाव १४८.५०, वैजापूर १७४.७५, खंडाळा १७२.५०, शिऊर १८९.२५, बोरसर १८९.२५, लोणी १७२, गारज १५१, लासुरगाव १२७.७५, महालगाव १७३.२५, नागमठाण १७३.२५, लाडगाव १७३.२५, घायगाव १६४.७५, जानेफळ १७५, बाबतारा १७१, कन्नड १३५.२५, चापानेर १३५.२५, देवगाव १६६, चिकलठाण ११७, किशोर १२६.५०, नाचनवेल १२५.२५, चिंचोली १२०.७५, करंजखेड १३९.५०, नागद ८५.५०, वेरूळ १८०.७५, सुलतानपूर ११०, बाजार सावंगी १०५, सिल्लोड १५९.७५, निल्लोड १२२.२५, भराडी ९०, गोळेगाव ७१, अजिंठा ७१.५०, आमठाणा ७८.५०, बोरगाव ७८.५०, अंभई ७८.५०, पालोद ७४.२५, शिवना ७१.५०, उंडणगाव ७१, सोयगाव ६८.५०, बनोटी १०३.७५, जरंडी ६६, फुलंब्री १२६.२५, आळंद ११३.५०, पिरबावडा १०९.५०, वडोद बाजार १२१, बाबतारा १३१..Marathwada Rainfall: पावसाने ओलांडली सप्टेंबर महिन्याची सरासरी.जालना जिल्हाभोकरदन १६५, सिपोरा १०१.२५, धावडा ७५.७५, अनवा १०६.२५, पिंपळगाव ११५.२५, हसनाबाद १०३, राजुर ६५.२५, केदारखेडा ७४.५०, माहोरा १०१.२५, नेर ६५.७५, शेवली ६५.७५, विरेगाव ८९.५०, अंबड ८१.७५, गोंदी ६८.५०, वडीगोद्री ६८.५०, सुखापुरी ६५.२५, दाभाडी १०३, बावणे पांगरी ६५.२५, घनसावंगी ६७.५०, राणी उचेगाव ६९.७५, तीर्थपुरी ६५.७५, कुंभार पिंपळगाव ६५.७५, अंतरवली ६५.७५, रांजणी ७५.७५, जाम समर्थ ७०.२५, पांगरी गोसावी ६५.७५..बीड जिल्हाबीड ७८.७५, पाली ८२.५०, नाळवंडी ७१.५०, राजुरी ७३.२५, पिंपळनेर ६८.२५, पेंडगाव ८०, मांजरसुंबा ७४.७५, चौसाळा ७०.७५, नेकनूर ६८.२५, लिंबागणेश ८५.२५, चऱ्हाटा ७३.२५, पारगाव ७३.२५, कुरला ७२.७५, पाटोदा ७०.७५, दासखेड ८१.७५, थेरला ८२, अमळनेर ९१.५०, आष्टी ७५, कडा ७५, टाकळसिंग ९९, दावलावडगाव १२९, धामणगाव ९५.५०, धानोरा ११३.७५, पिंपळा १०२, डोईठाण ९१.५०, आष्टी हना ७५, दादेगाव ११३.७५, गेवराई ६९, जातेगाव ८६.२५, पाचेगाव ६५.५०, धोंडराई ६८.७५, उमापूर ७५, चकलांबा ७५, सिरसदेवी ७१.२५, तलवाडा ६६.२५, माजलगाव ७०.५०, हनुमंत पिंपरी १०३.७५, होळ ७२.७५, विडा ६९.७५, नांदुर घाट ७४.७५, धारूर ६८.७५, वडवणी ६७.२५, कौडगाव ६७.२५, रायमोहा ६८, तींतरवणी ७५, ब्रम्हनाथ येळंब ८१, गोमलवाडा ९१.५०, खालापुरी ७१.२५. .सरासरी अतिवृष्टी झालेले तालुके (पाऊस मिलिमीटरमध्ये)छत्रपती संभाजीनगर जिल्हा : छत्रपती संभाजीनगर ७५.१, गंगापूर १५०.४, वैजापूर १६९.८, कन्नड १२७.९, खुलताबाद १३१.९, सिल्लोड ८७.९, सोयगाव ७१.९, फुलंब्री १२०.३.बीड जिल्हा : बीड ७३.१, पाटोदा ८१.५, आष्टी ९७, गेवराई ६७.३, वडवणी ६७.३, शिरूर कासार ७८जालना जिल्हा : भोकरदन १००.९, घनसावंगी ६८.७..५५ मंडलांत १०० मिलिमीटर पेक्षा जास्त पाऊसछत्रपती संभाजीनगर, जालना व बीड या तीन जिल्ह्यांतील सुमारे ५५ मंडलांत रविवारी सकाळपर्यंतच्या २४ तासात १०० मिलिमीटर पेक्षा जास्त पाऊस झाला. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील अतिवृष्टी झालेल्या ६८ पैकी तब्बल ४६ मंडळात १०० ते १९६ मिलिमीटर दरम्यान पाऊस झाला. जालना जिल्ह्यातील अतिवृष्टी झालेल्या २६ मंडलांपैकी चार मंडलांत १०१.२५ ते १६५ मिलीमीटर दरम्यान पाऊस झाला. तर बीड जिल्ह्यातील अतिवृष्टी झालेल्या ४९ मंडलांपैकी पाच मंडलांत १०२ ते १२९ मिलिमीटर दरम्यान पाऊस झाला..गिरजा-पूर्णाने ओलाडली धोक्याची पातळी.केदारखेडा : सततच्या मुसळधार पावसामुळे गिरजा पुर्णा नदीने धोकादायक पातळी ओलांडली आहे.भोकरदन तालुक्यातील लिंमगाव, वालसा, बेलोरा, मेरखेडा, केदारखेडा, बामखेडा, जवखेडा ठोंबरी, गव्हाण संगमेश्वर, नळणी बु या भागातून गिरिजा पूर्णा नदी पात्र वाहते. विशेषतः नदीपात्रातील उगमावरील झालेली ढगफुटी सदृश्य पाऊस तसेच आसपासच्या भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे नदीच्या पात्रात पाणी प्रचंड वेगाने वाढले आहे. काही ठिकाणी शेतजमिनी, पूल व रस्त्यांवर पाणी साचले असून लिंमगावजवळील पात्रावरील पुलावरून पुराचे पाणी असल्याने काही तास वाहतूक विस्कळीत झाली. जवखेडा ठोंबरी येथील बालासाहेब ठोंबरे, संतोष ठोंबरे,रवि ठोंबरे मोठ्या प्रमाणात नदीपात्रातील पुराचे पाणी शिरल्याने पिके पाण्याखाली येऊन वाहुन गेले..जालाना पुरस्थिती...जालना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या माहितीनुसार, पूरस्थितीमुळे जालना शहरातील २२५ नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. जिल्ह्यातील ५१ लघु प्रकल्पांपैकी ४८ प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. याशिवाय सात पैकी सहा मध्यम प्रकल्प ओव्हर फ्लो आहेत. नैसर्गिक आपत्तीत १२ जनावरांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात पाच ठिकाणी चार घरे व एका गोठ्याचे नुकसान झाले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.