Chh. Sambhajinagar News : मराठवाड्यातील मोठ्या अकरा प्रकल्पात सुमारे १७३.८७८ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. या सर्व प्रकल्पांची उपयुक्त पाणीसाठ्याची क्षमता १८२.०८० टीएमसी इतकी आहे. मराठवाड्यातील सर्वात मोठ्या जायकवाडी प्रकल्पात सुमारे ७५.०१३ टीएमसी अर्थात उपयुक्त पाणीसाठा क्षमतेच्या तुलनेत ९७.८५ टक्के पाणीसाठा झाला आहे..निम्न दुधना प्रकल्पात ६.३२ टीएमसी पाणीसाठा झाला असून तो प्रकल्पाच्या क्षमतेच्या ७३.९२ टक्के इतका आहे.पूर्णा येलदरी प्रकल्पात २७.५४० टीएमसी उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. जो क्षमतेच्या ९६.३१ टक्के इतका आहे. सिद्धेश्वर प्रकल्पात २.७४३ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. .Khandesh Water Storage : खानदेशातील प्रमुख प्रकल्पांत जलसंचय वाढला.माजलगाव प्रकल्पात १०.६५० टीएमसी,मांजरा प्रकल्पात ६.१६६ टीएमसी, पैनगंगा प्रकल्पात ३२.९९८ टीएमसी, मानार प्रकल्पात ४.८८० टीएमसी, निम्न तेरणामध्ये ३.१७२ टीएमसी, विष्णुपुरीत १.२४० टीएमसी तर सीना कोळेगाव प्रकल्पात ३.१५५ टीएमसी पाणी साठा झाला आहे..Marathwada Water Storage : ‘जायकवाडी’चा उपयुक्त पाणीसाठा ९८.३० टक्क्यांवर .सर्व ११ प्रकल्पांमधील उपयुक्त पाणी साठ्याचा विचार करता विष्णुपुरी प्रकल्पात सर्वात कमी ४३.४७ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे.दुसरीकडे माणार आणि सीना कोळेगाव हे दोन्ही प्रकल्प तुडुंब झाले आहेत..याशिवाय निम्न तेरणा, पैनगंगा, मांजरा, माजलगाव, सिद्धेश्वर, येलदरी व जायकवाडी या सर्व मोठ्या प्रकल्पांमध्ये ९० ते ९५ टक्क्यांच्या पुढे उपयुक्त पाणीसाठा झाला असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी दिली..मांजरा, माजलगाव मधून विसर्गबीड जिल्ह्यातील धनेगाव (ता. केज) येथील मांजरा प्रकल्पात जिवंत पाणीसाठा टक्केवारी ९८.६८ टक्के झाला. आवक १७ हजार ३८६.६५ क्युसेक्स तर विसर्ग १९ हजार २१८.५२ क्यूसेक्सने सुरू होता. माजलगाव धरणामध्ये येणाऱ्या येव्यामध्ये वाढ होत अाहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.