Agriculture Crisis in Ahilyanagar: मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत पूर्वमोसमी पावसासह गारपीट, वादळामुळे अलीकडच्या तीन दिवसांत सुमारे ५३४५ हेक्टरवरील शेतीपिकांना मोठा दणका बसला आहे. याशिवाय या नैसर्गिक आपत्तीत चार व्यक्ती तसेच सुमारे ७७ जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. घर, गोठे यांचेही नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे..महसूलच्या प्राथमिक माहितीनुसार, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, बीड, लातूर या जिल्ह्यांतील शेतीपिकांचे ३० मार्च ते २ एप्रिल दरम्यान पूर्वमोसमी पावसासह गारपीट, वादळामुळे नुकसान झाले. तब्बल २०९ गावांतील ८७८० शेतकऱ्यांच्या शेतीपिकांची या नैसर्गिक आपत्तीत हानी झाली. त्यामध्ये जिरायती १९४७.२९ हेक्टर, बागायती २११२.५० हेक्टर तर फळपिकांच्या सुमारे १२८५.७७ हेक्टरचा समावेश आहे..Hailstorm Crop Damage: वादळ, गारपिटीने पीकहानी सुरूच.१८ ते ३० मार्च दरम्यान छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड या तीन जिल्ह्यांत अंदाजे १२५०० हेक्टरवर शेतीपिकांचे नुकसान झाले होते. गुरुवारी (ता. २) सायंकाळच्या सुमारास जालना जिल्ह्यातील शहागड, हलक्या पावसाच्या सरी झाल्या..Rain Crop Damage Survey: आठ दिवसांत केवळ चार गावांचीच माहिती संकलित.४ व्यक्तींसह ७७ जनावरे दगावलीया नैसर्गिक आपत्तीमध्ये जन्म आणि बीडमधील प्रत्येकी दोन मिळून चार व्यक्तींचा मृत्यू झाला तर एक व्यक्ती जखमी झाला. याशिवाय दुधाळ लहान मोठी तसेच ओढकाम करणाऱ्या ७७ जनावरांचा या नैसर्गिक आपत्तीत मृत्यू झाला. एका घराच तसेच एका गोठ्याचेही या नैसर्गिक आपत्तीत नुकसान झाले.जिल्हानिहाय मृत्युमुखी पडलेली जनावरे : छत्रपती संभाजीनगर ८, जालना १६, परभणी ७, हिंगोली ४, नांदेड ११, बीड २२, लातूर २, धाराशिव ७..जिल्हानिहाय नुकसान क्षेत्र (हेक्टरमध्ये)छत्रपती संभाजीनगर ३३४०.३०जालना ५५९नांदेड १८४.७६बीड ४१लातूर १२२०.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.