Buldana News: छत्रपती शिवाजी महाराज यांनी मुघलांची सत्ता उलथवून टाकल्याप्रमाणे, आधुनिक काळात भाजपच नव्हे, तर कोणतीही सत्ता पालटून टाकण्याचे सामर्थ्य मराठ्यांत आहे, असे ठाम मत मराठा सेवा संघाचे संस्थापक शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर यांनी व्यक्त केले. जिजाऊ जयंतीदिनी जिजाऊ सृष्टीवर आयोजित कार्यक्रमात ते मराठा सेवा संघाचे कार्यकर्ते, हजारो जिजाऊ भक्तांना संबोधित केले..सिंदखेडराजा येथे जिजाऊ जन्मोत्सवाच्या निमित्ताने सकाळपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी मुख्य कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करताना श्री. खेडेकर म्हणाले, की सत्ताधाऱ्यांनी नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणली आहे. .Maratha Seva Sangh : महामानवांची बदनामी करणाऱ्यांवर राष्ट्रद्रोहाच्या गुन्ह्याची तरतूद करा.इंग्लंडमधील भारतीय वंशाचे डॉ. संग्राम पाटील यांना ताब्यात घेऊन दिलेला त्रास निषेधार्ह असल्याचे म्हटले. जगातील प्रत्येक व्यक्ती मराठा आहे असे ते म्हणाले. हिंदुत्वाला विरोध नसल्याचे सांगत त्यांनी जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज व स्वामी विवेकानंद यांच्या हिंदुत्वाला मान्यता असल्याचेस्पष्ट केले..Jijau Jayanti: जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त मराठा सेवा संघातर्फे विविध कार्यक्रम.कार्यक्रमात अलीकडील काळात मराठा सेवा संघामध्ये मरगळ झाल्याची खंत व्यक्त केली गेली. रस्ते विकास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा व्हिडिओ शुभेच्छा संदेश स्क्रीनवर दाखविण्यात आला. तर मराठा कलावंत रोहित पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे शौर्य दर्शविणारे गीत सादर केले. मराठा सेवा संघाचे इतिहास परिषदेचे गंगाधर बनबरे यांनी समाज जागृतीवर भाष्य करीत सध्याच्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीचा आलेख मांडला..या वेळी श्री. खेडेकर यांच्या हस्ते मराठा समाजातील कर्तृत्ववान व्यक्तींना पुरस्कार प्रदान करण्यात आले. यात सायबर क्षेत्रातील कैलास काटकर, शिक्षण क्षेत्रातील रामदास झोळ, कृषी क्षेत्रातील अमृतराव देशमुख, क्रीडा क्षेत्रातील रितेश पेरे आणि महिला क्रिकेटपटू गंगा कदम यांचा समावेश होता..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.