Nashik News : मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन शुक्रवारी (ता. २९) रोजी मुंबईत आझाद मैदानावर सुरू झाले. या आंदोलनात राज्यभरातील विविध जिल्ह्यातून कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. ते थेट आझाद मैदानावर जाऊन खासदार भास्कर भगरे यांनी पाठिंबा दिला. तर खासदार राजाभाऊ वाजे, सरोज अहिरे यांनी देखील पाठिंबा दर्शविला आहे. .शुक्रवारी सकाळी अनेक वाहने मुंबईच्या दिशेने रवाना झाली. त्यावेळी कालिकादेवी संस्थानचे प्रमुख अण्णा पाटील, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष नितीन सुगंधी,महाराष्ट्र माझा परिवाराचे संस्थापक बंटी भागवत,चंद्रकांत बनकर, संजय फडोळ, छावा क्रांतिवीर सेनेचे करण गायकर यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या आमदार सरोज अहिरे यांनी उपस्थित राहून सर्व कार्यकर्त्यांना शुभेच्छा देत पाठिंबा दर्शविल्याने हा चर्चेचा विषय ठरला..Maratha Reservation Protest: मराठवाड्यातील मराठे हे कुणबीच, मुदतवाढ नाहीच!.आमदार अहिरे म्हणाल्या, की मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी प्रदीर्घ काळापासून आंदोलन सुरू आहे. जरांगे पाटील मुंबईत आंदोलन करीत आहेत. राज्यभरातील मराठा समाजातील युवकांनी गोरगरीब जनतेने पाठिंबा जाहीर केलेला आहे. हा मुद्दा लक्षात घेऊन राज्य सरकारने या विषयाकडे गांभीर्याने आणि सहानुभूतीने पहावे..राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे यांनी आंदोलनस्थळी जाऊन जरांगे पाटील यांची भेट घेतली. यावेळी चर्चा करून मराठा आरक्षणाच्या मागणीला समर्थन असल्याचे सांगितले. नाशिकचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी देखील या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे..Maratha Reservation Protest: मराठवाड्यातील मराठे हे कुणबीच, मुदतवाढ नाहीच!.समाजाचा आत्मसन्मान अबाधित रहावा : खासदार वाजेजरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेले हे आंदोलन केवळ काही मागण्यांचा उच्चार नाही, तर समाजाच्या अस्तित्वाची व सन्मानाची हाक आहे. या आंदोलनाला शांतता, संयम आणि सामाजिक सलोख्याचा आधार दिला आहे.महिलांचा सन्मान राखणे, शासकीय संपत्तीचे रक्षण करणे, कायदा हातात न घेणे या त्यांच्या सूचनांमुळे हे आंदोलन लोकशाहीचा आदर्श ठरते. लाखो मराठा बांधव मुंबईतील आझाद मैदान येथे एकवटले आहेत. विशेषतः गरीब कुटुंबांसाठी शिक्षण आणि नोकरीच्या संधी मिळणे अत्यंत महत्त्वाचे आहे..शासनाने केवळ तात्पुरते आश्वासन न देता कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, जेणेकरून पुढे पुन्हा आंदोलन करण्याची वेळ समाजावर येणार नाही.खासदार म्हणून मी या आंदोलनाला पाठिंबा देतो. मराठा समाजाच्या न्याय्य मागण्या पूर्ण व्हाव्यात.शैक्षणिक व सामाजिक प्रगतीसाठीचा हक्क मिळावा आणि समाजाचा आत्मसन्मान अबाधित रहावा, हेच माझे ध्येय आहे. हा संघर्ष स्वाभिमानाचा असून, तो यशस्वी होईपर्यंत पाठिंबा अविरत राहील, असे खासदार राजाभाऊ वाजे यांनी दिलेल्या पाठिंब्याच्या पत्रात म्हटले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.