Maratha Reservation: मराठा आरक्षणाचा ‘जीआर’ मागे घेणार नाही : विखे पाटील
Radhakrishna Vikhe Patil: ‘‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळ उपसमितीने अतिशय विचार करून मराठा आरक्षणाबाबतचे निर्णय घेतले आहेत. त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्यामुळे शासन निर्णय (जीआर) मागे घेण्याचा कोणताही प्रश्न येत नाही.