माझ्या हत्येचा कट कोणी रचला?; मनोज जरांगे पाटील यांनी थेट धनंजय मुंडेंचे नाव घेतलंसुरुवातीला खोटे व्हिडिओ बनवा, असे सांगण्यात आले, ते त्यांना मिळेनात मग त्यांचा गोळ्या किंवा औषध देऊन घातपात करण्याचा कट होता.Maratha Quota Activist Manoj Jarange Patil Accuses Dhananjay Munde : माझी हत्या करण्याचा कट कोणी रचला?; याचा मोठा गौप्यस्फोट मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी शुक्रवारी (दि. ७) केला. त्यांनी थेट धनंजय मुंडे यांचे नाव घेत घटनाक्रम उघड केला. गोळ्या अथवा औषध देऊन मला मारण्याचा कट रचला होता. संशयितांनी मुंडेंना विचारले की गाडी घेऊन द्या. गाडीने ठोकतो. पण आम्ही सावध असल्याने आम्ही त्यांचे सगळे डाव उघडे पाडले, असा दावा जरांगे पाटील यांनी केला..ज्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे त्यातील दोघांपैकी एकाकडे बीडचा कांचन नावाचा माणूस गेला. धनंजय मुंडे आणि कांचन यांच्यात २० मिनिटे चर्चा झाली. कांचन हा मुंडेंचा कार्यकर्ता, पीए आहे. संशयितांना सुरुवातीला खोटे व्हिडिओ बनवा, असे सांगण्यात आले. ते त्यांना मिळेनात. मग त्यांचा गोळ्या किंवा औषध देऊन घातपात करण्याचा कट होता, असे जरांगे पाटील यांनी म्हटले आहे..Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट, अडीच कोटींची सुपारी, जालना पोलिसात तक्रार दाखल, दोघे ताब्यात.मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्याची धमकी देत त्यांच्या हत्येचा कट रचला असल्याची तक्रार जालना पोलीस अधीक्षक यांच्याकडे करण्यात आली आहे. स्वतः जरांगे पाटील यांनी याबाबत पोलीस अधीक्षकांची भेट घेतली होती. त्यांची हत्या करण्यासाठी अडीच कोटी रुपयांची सुपारी दिली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत त्यांची चौकशी सुरु आहे. या पार्श्वभूमीवर जरागेंनी आज पत्रकार परिषदत घेत नेमकं काय घडले? याचा घटनाक्रम सांगितला. .Manoj Jarange Patil: सरसकट कर्जमाफी करा, नाहीतर रस्त्यावर उतरू ; मनोज जरांगे पाटील .''आम्ही बेसावध असतो तर ही घटना घडून गेली असती. पण सावध राहिल्याने त्याचे सगळे डाव आम्ही उघडे पाडले. पहिला मुद्दा, खोटे व्हिडिओ बनवा. दुसरा खून करा आणि तिसरा जेवणातून गोळ्या द्या, औषधे द्या, अशी पद्धतीने घातपात करण्यासाठी अडीच कोटींत व्यवहार ठरला होता. अशा नीच प्रवृत्तीचा नायनाट झाला पाहिजे," असे जरांगे यांनी म्हणाले..आमच्या माहितीप्रमाणे धनंजय मुंडे संशयितांना वारंवार प्रत्यक्ष भेटत राहिला. गोळ्या पोहोच करतो, असेही त्यांना सांगितले. यात केवळ दोघे नाहीत. तर अंतरवाली सराटी, बीड, गेवराई तालुक्यातील असे मिळून १० ते १२ जण आहेत. संशयितांनी विचारले गाडी घेऊन द्या. गाडीने ठोकतो. मुंडे म्हणाले जुनी गाडी बाहरेच्या राज्यातील पासिंगची आहे. हा कट रचणारा मूळ धनंजय मुंडे आहे, असा आरोप जरागेंनी केला..अशी वृत्ती राज्याला शोभणारी नाही. याचा सखोल तपास करावा. गोपिनाथ मुंडे यांनी असे कधी राजकारण केले नाही. हे लोकांना मारतंय आणि त्यांचा डावं संपवतंय. वंजारी समाजात खूप चांगली लोक आहेत. पण ही टोळी संपणं गरजेचे आहे. जात मेली तरी चालतंय, हे ब्लॅकमेल करुन राजकारण करतंय, असे सांगत जरागेंनी मुंडेंवर निशाणा साधला..मराठा संघटना, मराठा सेवक, मराठा समाजाचे नेते यांनी हा विषय गंभीरपणे घ्यावा, असे सांगत जरागेंनी मराठा समाजाला शांत राहण्याचे आवाहन केले. मी मराठा समाजाला शब्द देतो की मी जिवंत आहे तोपर्यंत तुम्हाला टेन्शन नाही. पण सगळ्यांनी सावध पवित्रा घेणे गरजेचे आहे. तुम्ही हसला पाहिजे असे काम करुन दाखवतो. हा विषय सहजपणे घेऊ नका, आज माझ्यावरती बेतलं, उद्या तुमच्यावरती वेळ येऊ शकते. हा विषय गांभीर्याने घ्या, असे ते म्हणाले.असे करणाऱ्यापेक्षा करुन घेणारा अधिक जबाबदार आहे. अशा वृत्तीचा नायनाट व्हायला पाहिजे, असे त्यांनी नमूद केले. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.