Mumbai News: मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी शुक्रवारी (ता.२९) आझाद मैदानात बेमुदत उपोषणाला सुरुवात केली. हजारो लोकांच्या उपस्थितीत सुरू झालेल्या या आंदोलनामुळे दक्षिण मुंबईतील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडून गेली. .मराठा आंदोलक आझाद मैदानासह दक्षिण मुंबईतील प्रमुख रस्ते आणि चौकांमध्ये आंदोलन करीत आहेत. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, बृहन्मुंबई महानगरपालिका, फाउंटन चौक, फॅशन स्ट्रीट, गेटवे ऑफ इंडिया आणि मंत्रालय परिसरांसह दक्षिण मुंबईतील प्रमुख चौकात आंदोलन, घोषणाबाजी सुरू असल्यामुळे या भागातील वाहतूक ठप्प झाली होती..Maratha Reservation: आरक्षण देऊन मराठा समाजाची मने जिंका: जरांगे पाटील .आंदोलकांनी मंत्रालयासमोरील चौकही व्यापला होता. प्रचंड गर्दीमुळे मैदानावर आंदोलकांना उभे राहण्यासाठीही जागा नव्हती. तसेच संततधार पावसामुळे मैदानावर चिखल झाला होता. त्यामुळे आंदोलकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते..आंदोलकांनी हलगी वाजतगाजत घोषणाबाजी सुरू केल्यामुळे सीएसटीवर गोंधळ उडाला होता. काही आंदोलक रूळावर उतरल्यामुळे लोकलच्या वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता, त्यामुळे पोलिसांनी आंदोलकांना सीएसटीच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, पण आंदोलकांची संख्या मोठी असल्याने सर्व यंत्रणा अपुऱ्या पडत होत्या..Maratha Reservation: आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाही: मनोज जरांगे.आंदोलनाला एक दिवसाची मुदतवाढश्री. जरांगे पाटील यांनी प्रशासनाकडे आंदोलनाला मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. त्यानंतर आंदोलनाला एक दिवसाची मुदतवाढ देण्यात आली आहे. काही अर्टी-शर्तींसह ही परवानगी दिल्याचे सांगण्यात आले..आंदोलकांचा ओघ सुरूचमराठा आंदोलक शुक्रवारी मुंबईत मोठ्या संख्येने पोहोचले असतानाच, राज्याच्या ग्रामीण भागांतून मुंबईकडे येण्याचा ओघच सुरूच आहे. आंदोलकांच्या वाहनांना मुंबईत येण्यास रस्ता नसल्यामुळे वाहने वाशी, पनवेल, कल्याण भागांत लावून ते पायी आणि लोकलने प्रवास करीत आझाद मैदान गाठण्याचा प्रयत्न करीत आहेत..‘गणरायाचे दर्शन घ्या, मुंबई पाहा’आझाद मैदानावर प्रचंड गर्दी असल्यामुळे आणि संततदार पावसामुळे लोकांना अडचणीचा सामना करावा लागत असल्यामुळे श्री. जरांगे पाटील यांनी आंदोलकांना ‘‘वाहने व्यवस्थित रस्त्याच्या बाजूला वाहनतळावर लावा आणि गणरायाचे दर्शन घ्या. मुंबई पाहा, समुद्रकिनारा पाहा. हुल्लडबाजी करू नका. पोलिसांना सहकार्य करा,’’ असे आवाहन श्री. जरांगे पाटील यांनी केले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.