Maratha Legacy : अहिल्यानगर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आग्रा सुटकेच्या अद्वितीय पराक्रमाला ३६० वर्षे पूर्ण झाले आहेत. तसेच अखिल भारतीय मराठा महासंघाच्या गौरवशाली १२५ वर्षे पूर्ण झाले आहेत. त्यानिमित्त आग्रा (उत्तर प्रदेश) येथे अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे सोमवारी (ता. १७) विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन अखिल भारतीय मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष संभाजी दहातोंडे पाटील यांनी केले आहे. .दहातोंडे पाटील यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अद्वितीय शौर्य, मुत्सद्देगिरी, धैर्य आणि असामान्य स्वराज्यनिष्ठेची साक्ष देणाऱ्या आग्रा सुटकेच्या ऐतिहासिक पराक्रमाला ३६० वर्षे पूर्ण होऊन ३६१ व्या वर्षात पदार्पण होत आहे. .Manoj Jarange Patil: राज्यात ५८ लाख नोंदी सापडल्या; त्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या, कोल्हापूर गॅझेटियर लागू करा, जरांगे पाटलांची मागणी.या ऐतिहासिक स्मृतीला अभिवादन करण्यासाठी अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय पदाधिकारी आग्रा येथे दाखल होत असून, आग्रा सुटका स्मरण सोहळ्याच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाचे स्मरण आणि स्वराज्याच्या विचारांचा जागर करण्यात येणार आहे..Eknath Shinde: ते देशात अराजकता पसरवण्याचे काम करताहेत, एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल.याचवेळी, अखिल भारतीय मराठा महासंघाच्या १२५ वर्षांच्या गौरवशाली सामाजिक वाटचालीनंतर महासंघ १२६ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. राष्ट्रहित, समाजहित, सामाजिक एकता, शिक्षण, संघटन आणि मराठा समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कार्यरत असलेल्या या संघटनेच्या इतिहासातील हा महत्त्वपूर्ण टप्पा आहे. .महासंघाच्या १२५ वर्षांच्या वाटचालीचा राज्यस्तरीय गौरव केला जाणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन मराठा महासंघाचे अध्यक्ष दिलीप जगताप, प्रदेशाध्यक्ष संभाजी दहातोंडे पाटील, संतोष नानावटे, दिलीप धंधरे, अविनाश राणे, आनंद मोरे, महेश सावंत, धोंडू जाधव यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.