Nagpur News : राज्य शासनाने तयार केलेल्या ‘नवीन वाळू धोरण २०२५’ला आव्हान देत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. या धोरणामध्ये अनेक त्रुटी असून पर्यावरण संरक्षणाशी संबंधित नियमांचे पालन होत नाही, असा आरोप या याचिकेद्वारे करण्यात आला आहे. .कृष्णकुमार अग्रवाल असे या जनहित याचिका दाखल करणाऱ्याचे नाव आहे. या प्रकरणावर न्यायमूर्ती अनिल किलोर आणि न्यायमूर्ती रजनीश व्यास यांच्या खंडपीठासमक्ष सुनावणी झाली. याचिकेनुसार, राज्य शासनाने ८ एप्रिल २०२५ रोजी जारी केलेले नवीन वाळू धोरण पर्यावरण संरक्षण कायद्याच्या तरतुदी, केंद्र सरकारची मार्गदर्शक तत्त्वे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन करते..Sand Policy Maharashtra : खासगी जागामालकांचा कृत्रिम वाळूकडे कल.हे धोरण केंद्राच्या शाश्वत वाळू व्यवस्थापन मार्गदर्शक तत्त्वे २०१६, वाळू खाणकामासाठीची मार्गदर्शक तत्त्वे २०१८ आणि अंमलबजावणी आणि देखरेख मार्गदर्शक तत्त्वे २०२० याच्याशी जुळत नाही. धोरणांतर्गत केलेल्या अभ्यासात वैज्ञानिक पद्धतीचा अभाव आहे. यामुळे नदी तळाची रचना आणि पर्यावरणाला गंभीर नुकसान होत आहे..Artificial Sand: कृत्रिम वाळू धोरणासाठी जिल्ह्यात आराखडा तयार.त्यामुळे शासनाने हे वाळू धोरण रद्द करून केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार एक नवीन, विज्ञानाचा आधार असलेले आणि पर्यावरण अनुकूल धोरण तयार करावे, अशी मागणी याचिकाकर्त्याने केली आहे. न्यायालयाने या प्रकरणात महसूल, वन विभाग, नागपूर जिल्हाधिकारी, जिल्हा खनन अधिकाऱ्यांना नोटीस बजावत दहा आठवड्यांत उत्तर सादर करण्याचे आदेश दिले आहेत..अवैध वाळू उपशाला चालनाया धोरणामुळे अवैध वाळूउपसा, नदीकाठांच्या वाळूची होणारी धूप, भूजल स्तरातील घसरण आणि पर्यावरणीय व्यवस्थेवर प्रतिकूल परिणाम वाढण्याची शक्यता आहे, असेही याचिकाकर्त्याने नमूद केले. याशिवाय, धोरणात सरकारी अधिकाऱ्यांच्या सुरक्षेशी संबंधित कोणतीही व्यवस्था नाही आणि पर्यावरणीय कायद्यांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाईची कोणतीही स्पष्ट तरतूद करण्यात आलेली नाही..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.