Mumbai News: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी २७ ऑगस्टपासून मुंबईकडे कूच करण्याची घोषणा केली असून, २९ ऑगस्टला कोट्यवधी मराठा बांधवांसह मुंबईत धडकणार आहेत. गणपती उत्सवाच्या काळात होणाऱ्या या आंदोलनामुळे वाहतूक कोंडी आणि कायदा-सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. .दरम्यान, राज्य सरकारने मराठा समाजाच्या मुद्द्यांवर तोडगा काढण्यासाठी राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमितीचे पुनर्गठन केले आहे. सरकारने या आंदोलनावर चर्चा करण्यासाठी नुकतीच बैठक घेतली असून, जरांगे यांच्या सगेसोयरे अध्यादेशाच्या मागणीवर सरकार काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष आहे..Manoj Jarange Patil : मुंबईच्या आंदोलनात सहभागी व्हा.या पार्श्वभूमीवर, राज्य सरकारने मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक मुद्द्यांवर शिफारशी करण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीचे पुनर्गठन केले आहे. या समितीचे अध्यक्षपद राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे देण्यात आले आहे..Manoj Jarange Patil : मनोज जरांगे करणार मुंबई जाम.या समितीत चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, दादा भुसे, उदय सामंत, शंभूराज देसाई, आशिष शेलार, शिवेंद्रसिंहराजे भोसले, माणिकराव कोकाटे आणि बाबासाहेब पाटील हे मंत्री सदस्य म्हणून कार्यरत असतील. ही समिती मराठा आरक्षणासंदर्भातील प्रशासकीय आणि कायदेशीर कामकाजाचा समन्वय ठेवेल, तसेच मराठा समाजाशी संबंधित इतर बाबींवरही लक्ष देईल..या समितीच्या जबाबदाऱ्यांमध्ये न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीशी समन्वय साधणे, मराठा आंदोलक आणि त्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा करणे, जात प्रमाणपत्राशी संबंधित प्रक्रिया सुलभ करणे, तसेच मराठा समाजासाठी असलेल्या महामंडळे आणि योजनांचा आढावा घेणे यांचा समावेश आहे. सरकारने या समितीच्या माध्यमातून मराठा समाजाच्या मागण्यांवर तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू केला आहे..Manoj Jarange Patil: जरांगे पाटील यांचे उपोषण सहाव्या दिवशी स्थगित.दरम्यान, शुक्रवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यात एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जरांगे यांची सगेसोयरे अध्यादेश लागू करण्याची मुख्य मागणी आहे. ही मागणी सरकार कशा प्रकारे हाताळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे..जरांगे यांनी यापूर्वीही मराठा आरक्षणासाठी अनेक आंदोलने केली आहेत. आता मुंबईत होणारे हे आंदोलन गणपती उत्सवाच्या काळात होत असल्याने सरकार आणि प्रशासनासमोर मोठे आव्हान आहे. जर कोट्यवधी लोक मुंबईत दाखल झाले, तर शहरातील वाहतूक व्यवस्था आणि कायदा-सुव्यवस्थेवर मोठा ताण येऊ शकतो. त्यामुळे सरकार या आंदोलनाला कशा प्रकारे सामोरे जाते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.