Pune News: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारने दिलेल्या शेतकरी कर्जमाफीच्या जून २०२६ पर्यंतच्या आश्वासनावर सडकून टीका केली आहे. बच्चू कडू यांच्या नागपूर येथील आंदोलनानंतर मुंबईत झालेल्या बैठकीत सरकारने हे आश्वासन दिले, मात्र जरांगे यांनी याला शेतकऱ्यांची थेट फसवणूक म्हटले. "तोपर्यंत शेतकरी मेलाच ना," असे म्हणत त्यांनी सरकारला मोगलांपेक्षा क्रूर संबोधले. सरसकट कर्जमुक्ती द्या, समिती बरखास्त करा, अन्यथा रस्त्यावर उतरू, असा इशारा त्यांनी दिला..जरांगे पाटील म्हणाले, "सरकारने शेतकऱ्यांना पूर्णपणे फसवले आहे. ३० जून २०२६ म्हणजे जवळपास दीड वर्षानंतरची तारीख! तोपर्यंत शेतकरी जगणार तरी कसा? सहा महिने सांगा तर समजले असते, पण इतके लांब का? हे आश्वासन विश्वास ठेवण्यासारख नाही.".Manoj Jarange Patil: आंदोलन ताकदीनं लावून धरा, आम्ही आहोतच, सरकारचा डाव प्रतिडावानं उधळून टाका : मनोज जरांगे.त्यांनी सरकारची तुलना मोगलांशी करताना म्हटले की, "मोगलांपेक्षा हे सरकार शेतकऱ्यांशी अधिक क्रूर वागत आहे. सूडभावनेने निर्णय घेतले जात आहेत." ते पुढे म्हणाले, "मी स्वतः राज्य आणि केंद्र सरकारकडून मिळालेली कोणतीही मदत स्वीकारणार नाही. शेतकऱ्यांनी कुणावरही विश्वास ठेवू नये. आता दंडुकेच हाती घ्या आणि लढा द्या.".सरसकट आणि तात्काळ कर्जमुक्ती द्यावी...कर्जमाफीच्या मुद्द्यावर जरांगे यांनी स्पष्ट मत मांडले की, शेतकऱ्यांना सरसकट आणि तात्काळ कर्जमुक्ती द्यावी. कोणतीही समिती नेमण्याची गरज नाही, अशी समिती त्वरित बरखास्त करावी. अन्यथा सरकारला रस्त्यावर फिरू देणार नाही, असा कडक इशारा त्यांनी दिला. न्यायालयाच्या निर्णयाचा सन्मान करतो, पण सध्याची परिस्थिती अजिबात चांगली नसल्याचे ते म्हणाले..Manoj Jarange Patil: दिवाळीनंतर शेतकरी नेत्यांना एकत्र करून रणनीती ठरवणार; मनोज जरांगे पाटील.बैठकीतील आश्वासन आणि शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही व्यक्तिशः टीका केली. "फडणवीस हे गोड बोलतात, पण मागून दुसरा डाव खेळतात. हे लोक काहीही करू शकतात," असे सांगत त्यांनी सावधगिरीचा इशारा दिला. ओबीसी समाजाबाबत बोलताना ते म्हणाले, "ओबीसी हा आमचा डीएनए आहे. दोन्ही बाजूंनी गोड बोलू नका. एकीकडे सांगता ओबीसींना धक्का लागला नाही, दुसरीकडे जीआर दिला. मग आरक्षण प्रमाणपत्रे कधी देणार?" सरकार प्रक्रिया पुढे नेत नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली..दरम्यान, बच्चू कडू यांच्या आंदोलनाला मिळालेल्या या आश्वासनाने शेतकरी वर्गात संमिश्र प्रतिक्रिया आहेत. सरकारने दिलेली मुदत आणि प्रक्रिया यामुळे असंतोष वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.