Antarwali Sarati to Mumbai Jarange Patil : अंतरवाली सराटी येथून मनोज जरांगे पाटील यांनी मंगळवारी (ता. १५) उपोषणाच्या अठराव्या दिवशी ग्रामदैवत हनुमान मंदिरात दर्शन घेऊन मुंबईच्या दिशेने रवाना झाले.मुंबईत उपोषण करण्यासाठी शासनाने दोन वेळा परवानगी नाकारली होती. जरांगे यांनी आपण एकटे आणि दहा-बारा सहकारी सोबत जाणार असल्याचे जाहीर केले होते. .तरीही त्यांना पाठिंबा देण्यासाठी समाजबांधवांनी अंतरवाली सराटी येथे मोठी गर्दी केली होती. उपोषणस्थळी उपस्थित मराठा बांधवांनी सरकारविरोधात घोषणा देत निषेध केला. महिलांनी ठिकठिकाणी जरांगे यांचे औक्षण केले..Manoj Jarange Patil: उपोषण सोडणार नाही, मुंबईत जाणारच; मनोज जरांगे पाटलांची ठाम भूमिका.अनेक जण मुंबईत जाण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र जरांगे यांनी सध्या कोणीही मुंबईत येऊ नये, असे आवाहन केले होते. त्यामुळे लोक केवळ पाठिंबा देण्यासाठी उपस्थित होते. जरांगे रवाना झाल्यानंतर मात्र असंख्य वाहनांचा ताफा आणि मोठ्या संख्येने समाजबांधव अंतरवाली सराटी ते वडिगोद्रीपर्यंत त्यांच्यासोबत होते..तत्पूर्वी, आरोग्य विभागाचे सिव्हिल सर्जन डॉ. राजेंद्र पाटील आणि डॉ. शुभम राठोड यांच्या पथकाने जरांगे यांची आरोग्य तपासणी केली. उपोषणस्थळी महसूल प्रशासनाकडून उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी, अंबडचे तहसीलदार सोमेश मोहिते, वडिगोद्री मंडळ अधिकारी संदीप नरुटे, तलाठी योगेश गुरव आदी उपस्थित होते. पोलिस उपविभागीय अधिकारी सिद्धेश्वर धुमाळ, सहायक पोलिस निरीक्षक अमोल गुरले यांच्यासह पोलिस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते..Manoj Jarange Patil: 'मरण आलं तरी चालेल...'; मनोज जरांगे अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने निघाले.उपोषणस्थळावरून जरांगे गाडीत बसण्यासाठी निघाले असता एकच गर्दी झाली. या गर्दीत अनेकांचे मोबाइल आणि पैसे चोरीला गेले. यामध्ये पत्रकार रवींद्र जैस्वाल यांचा मोबाइलही चोरीला गेला. त्यांनी गोंदी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. चोरीला गेलेले मोबाइल, पैशांचा शोध घेतला जात असल्याचे सहायक पोलिस निरीक्षक अमोल गुरले यांनी सांगितले..सोबत असलेले सहकारीअंतरवाली सराटीचे सरपंच पांडुरंग तारख, गंगाधर काळकुटे (रा. बीड), संजय कटारे (साष्ट पिंपळगाव, ता. अंबड), बद्रीनाथ तारख, ज्ञानराज तारख, आनंद तारख, पप्पू तारख (अंतरवाली सराटी), एक अंगरक्षक आणि वाहनचालक समाधान कागदे आदी सहकारी जरांगे त्यांच्या सोबत गेले आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.