Manoj Jarange Patil Protest: मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज शनिवार (दि. २९ ऑगस्ट) पासून अंतरवाली सराटीत बेमुदत उपोषण सुरु केले. त्यांचे अंतरवालीतील हे ११ वे उपोषण आहे. एकूण ५८ लाख नोंदीच्या आधारावर सर्वांना कुणबी प्रमाणपत्रे देण्याच्या प्रमुख मागणीसाठी त्यांनी एल्गार पुकारला आहे. .आमच्या मागण्यांवर केवळ शासन निर्णय (जीआर) नको तर त्यांची अंमलबजावणी करावी. अंमलबजावणीशिवाय आता माघार नाही. याबाबत लवकर कार्यवाही केली नाही तर आंदोलनासाठी मुंबईला जाईन. जोपर्यंत सर्व मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत काहीही झाले तरी माघार घेणार नाही, असा इशारा त्यांनी सरकारला दिला. आम्ही सरकारला तीन वर्षे वेळ दिला. तुम्हाला मराठ्यांच्या लेकरांचं कल्याण होऊ द्यायचे नाही, असा आरोपही त्यांनी केला. .Manoj Jarange Patil: कुणबी प्रमाणपत्रे रद्द करण्याचा सरकारचा कट, पण कुणालाही सोडणार नाही, मनोज जरांगे पाटील संतप्त.तीन वर्षांपासूनचा हा लढा आता विजयाच्या उंबरठ्यावर आहे. मराठ्यांची बलाढ्य ताकद दिसली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले आहे. ५८ लाख नोंदींचे प्रमाणपत्र द्यावे. प्रमाणपत्र कसे देणार? हे अधिकाऱ्यांनी अंतरवाली सराटीत येऊन सांगायला हवे. सातारा, कोल्हापूर, औंध, पुणे गॅझेटचा जीआर काढायला हवा. जीवन संपवलेल्या मराठा कुटुंबांतील वारसांना पात्रतेनुसार नोकऱ्या द्याव्यात. स्वतंत्र मराठा कुणबी मंत्रायल स्थापन करावे. सारथीच्या बंद केलेल्या योजना सुरु करा. मराठवाड्यातील चार रद्द करण्यात आलेले जात प्रमाणपत्र वैध करुन घ्या. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या व्याजाचे परतावे द्या. आंदोलकावरील सर्व गुन्हे मागे घ्या, अशी मागण्या त्यांनी सरकारपुढे ठेवल्या आहेत. .Manoj Jarange Patil: राज्यात ५८ लाख नोंदी सापडल्या; त्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या, कोल्हापूर गॅझेटियर लागू करा, जरांगे पाटलांची मागणी.त्यांनी सर्व मराठा बांधवांना अंतरवाली सराटीत येण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी आंदोलनासाठी मुंबईचा पर्याय ठेवला आहे. दरम्यान, जरागेंनी मुंबईत येऊ नये यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न सुरु आहेत. जरागेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अंतरवालीत पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे..जरागेंच्या आंदोलनावर लक्ष्मण हाकेंची जोरदार टीकादरम्यान, जरागेंच्या आंदोलनावर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी जोरदार टीका केली. शेवटचा लढा आणि ओबीसींचे आरक्षण गाडा, असे जरागेंचे धोरण असल्याचा आरोप त्यांनी केला. अनधिकृत प्रमाणपत्र काढा आणि ओबीसींना मातीत गाडा, असा यामागील डाव असल्याचा दावा त्यांनी केला. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.