Book Review: गावगाड्याच्या वर्तमानाची यथार्थ मांडणी
Marathi Literature: मारुती ज्ञानू मांगोरे लिखित ‘मांजरखिंड’ ही कादंबरी गाव, वाडी-वस्ती, शिवार, राजकारण, शिक्षण, बेकारी आणि भ्रष्टाचार अशा अनेक स्तरांवर ग्रामीण वास्तव उलगडते. कोल्हापुरी बोलीचा अस्सल बाज जपणारी ही कादंबरी न्हानगं आणि मानेवाडी या गावांच्या सुखदुःखांची जिवंत कथा सांगते.