Junnar News: माणिकडोह बिबट निवारा केंद्रात सध्या १४० हून अधिक बिबटे आहेत. बिबट निवारा केंद्राची क्षमता ४० वरून ६० इतकी झाली असली तरी सध्या येथे ८० हून अधिक अतिरिक्त बिबटे आहेत. ५० बिबटे गुजरात येथील वनतारा प्राणी संग्रहालयात जाण्याचा मार्ग मोकळा झाला असला तरी अद्याप त्यांच्या स्थलांतराला मुहूर्त मिळू शकलेला नाही. .जुन्नर वन विभागाकडून देशातील सुमारे ९० प्राणी संग्रहालयांशी बिबट नेण्याबाबत पत्रव्यवहार करण्यात आला असून यातील ६ संग्रहालयांनी १५ बिबटे घेण्याबाबत मान्यता दिली. आता त्या संग्रहालयांकडून प्रधान मुख्य वन संरक्षक वन्यजीव आणि सेंट्रल झू अथॉरिटी, दिल्ली यांच्याकडून परवानगी घेण्याबाबत पत्रव्यवहार सुरू असून लवकरच आणखी १५ बिबटेदेखील या संग्रहालयांत जाणार आहेत..Human-Leopard Conflic: बिबट्या-मानव संघर्षावर वन विभागाची व्यापक तयारी.८० हून अधिक अतिरिक्त बिबटेजुन्नर येथील माणिकडोह बिबट निवारा केंद्रात सध्या १४० हून अधिक बिबटे आहेत. बिबट निवारा केंद्राची क्षमता ४० वरून ६० झाली असली तरी ८० हून अधिक बिबटे अतिरिक्त आहेत, हे बिबटे ज्या ठिकाणी ट्रॅप होऊन पिंजऱ्यात पकडले आहेत त्याच पिंजऱ्यात हे बिबटे माणिकडोह निवारा केंद्रात ठेवण्यात आले आहेत. बिबट निवारा केंद्राची क्षमता ६० बिबट्यांची असल्याने अतिरिक्त बिबट्यांसाठी ८० हून अधिक पिंजरे गुंतून पडले आहेत..बिबट मादींच्या नसबंदीला गती मिळणार का?जुन्नर वन विभागातील जुन्नर, आंबेगाव, शिरूर, खेड या तालुक्यांत बिबट्यांची संख्या खूप वेगाने वाढत आहे. यामुळे बिबट्यांच्या हल्ल्याच्या घटनाही वाढल्या आहेत. गेल्या २५ वर्षांत ५६ जणांचा मृत्यू झाला असून त्यात अलीकडच्या ७ वर्षांत २७ जणांना आपला जीव गमावा लागला आहे. बिबट्यांच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने बिबट्यांच्या नसबंदीचा निर्णय घेतला खरा परंतु ही प्रक्रिया कधी, किती वेगाने पूर्ण होईल माहीत नाही. ही प्रक्रिया जलदगतीने पूर्ण झाली नाही तर बिबट्यांची संख्या दुप्पट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे..leopard Trapped: देवगाव येथे ६३ दिवसांत सहावा बिबट्या जेरबंद .राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी ‘वनतारा’ला माणिकडोह निवारा केंद्रातील बिबटे घेण्याबाबत विनंती केली होती. त्यानुसार ‘वनतारा’ने सकारात्मक भूमिका घेऊन मान्यता दिली. तसेच गुजरातचे प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव यांचीदेखील मान्यता मिळाली..जुन्नर वनउपसंरक्षक प्रशांत खाडे म्हणाले, ‘‘माणिकडोह निवारा केंद्रातील ५० बिबटे ‘वनतारा’मध्ये घेण्याबाबत कुठलीही अडचण राहिली नाही. ‘वनतारा’च्या तांत्रिक पथकाने या ठिकाणी येऊन वेळोवेळी भेट दिली. पुढील काही दिवसांत हे बिबटे गुजरातला जाणार आहेत. माणिकडोह निवारा केंद्रातील बिबटे घेण्याबाबत देशातील ९० प्राणी संग्रहालयांशी प्रत्यक्ष बोलून व पत्रव्यवहार करण्यात आले. त्यातील ६ संग्रहालयांकडून १५ बिबटे घेण्याबाबत मान्यता मिळाली आहे. आणखी ठिकाणी सकारात्मक बोलणी सुरू आहेत. बिबट्यांपासून संरक्षणासाठी असलेल्या यंत्रणांची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली असून ही यंत्रसामुग्रीदेखील लवकरच मिळेल.’’.बिबट्यांच्या खाद्यासाठी चिकनवर ५० हजारांहून अधिक खर्चबिबट निवारण केंद्रातील १४० हून अधिक बिबट्यांना खाद्यापोटी दररोज चिकन देण्यात येते, बिबट्यांना रोज दोन किलो चिकन दिले जात असून त्यातून आठवड्यातून दोन दिवस ब्रेक असतो यामुळे बिबट्यांच्या खाद्यापोटी चिकनवर रोज सुमारे ५० हजार रुपयांहून अधिक खर्च सरकार करत आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.