Palghar News: विक्रमगड तालुक्यात यंदा परतीच्या पावसाने नोव्हेंबर महिन्यापर्यंत हजेरी लावल्याने भात उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यासोबतच परतीच्या पावसाचा कालावधी वाढल्याचा परिणाम आंबा फळपिकावरही होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. आंबा पिकाला उशिरा मोहर येण्याची शक्यता असून, त्यामुळे यंदा आंबा उत्पादन जून महिन्यात येण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे..दरवर्षी निसर्गाचा वाढता लहरीपणा, लांबलेला पावसाळा आणि त्यामुळे वातावरणात होणारे बदल यांचा परिणाम हंगामी पिकांवर मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. साधारणतः सप्टेंबर महिन्यात परतीच्या पावसाला सुरुवात होते. मात्र यंदा परतीचा पाऊस थेट नोव्हेंबर महिन्यापर्यंत सुरू राहिला.सामान्य परिस्थितीत नोव्हेंबरमध्ये थंडी वाढू लागते आणि डिसेंबरमध्ये आंब्याला मोहर येण्यास सुरुवात होते. .Mango Season: पावसामुळे सिंधुदुर्गात आंबा हंगाम महिनाभर लांबणार.परंतु यावर्षी जानेवारीचा पहिला आठवडा उलटूनही अनेक आंबा झाडांना अद्याप मोहर आलेला नाही. दरम्यान या संदर्भात कृषी विभागाचे अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.आंब्याला मोहर येण्याचा कालावधी पुढे सरकण्याची शक्यता असून, त्यामुळे आंबा उत्पादन साधारण ३० ते ३५ दिवसांनी उशिरा येण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. परिणामी आंबा बागायतदार अडचणीत सापडले आहेत. .Mango Season: हापूस यंदा एकाच टप्प्यात.विक्रमगड तालुका व परिसरात १८३ हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रात आंबा लागवड करण्यात आलेली आहे. झडपोली, माण, ओंदे, आलोंडे, केव, कुरंजे, आपटी, मलवाडा आदी भागांतील बागायतदार दरवर्षी मोठ्या प्रमाणावर आंबा उत्पादन घेत असून चांगला नफा मिळवत आले आहेत. मात्र गेल्या दोन-चार वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आहे..यंदा परतीच्या पावसाने नोव्हेंबरपर्यंत हजेरी लावली. अपेक्षित थंडी अद्याप पडलेली नाही. त्यात अवकाळी पावसाचाही फटका बसत आहे. त्यामुळे आंब्याला मोहर उशिरा येऊन हंगाम लांबण्याची शक्यता आहे.- बबन सांबरे, आंबा उत्पादक, शेतकरी, ओंदे.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.