Farmers Advice: आंबा उत्पादनात केवळ उत्पादनाचे प्रमाण वाढविणे पुरेसे नसून फळांची गुणवत्ता, आकार, रंग, टिकवणक्षमता आणि बाजारपेठेतील मागणी यांचाही विचार करणे महत्त्वाचे आहे. निर्यातक्षम आंबा उत्पादनासाठी दर्जेदार फळे, योग्य काढणी, हाताळणी, प्रतवारी, पॅकिंग आणि बाजारपेठेच्या गरजांनुसार उत्पादनाचे नियोजन करणे आवश्यक असल्याचे मत आंबा तज्ज्ञ डॉ. भगवानराव कापसे यांनी व्यक्त केले..लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या जयंतीनिमित्त जयप्रभा ग्रामीण विकास मंडळ, पाटोदा (ता. अंबाजोगाई) यांच्या वतीने नुकतेच अंबाजोगाई येथे आंबा लागवड, अतिघन लागवड, आंबा बागेचे व्यवस्थापन आणि आंबा निर्यात या विषयांवर आंबा लागवड तज्ज्ञ डॉ. कापसे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते..Kesar Mango Farming: केसर आंबा शेतीला शास्त्रशुद्ध, व्यावसायिक दिशा.अध्यक्षस्थानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते सुधाकरराव महाजन होते. कार्यक्रमाला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे माजी कुलसचिव डॉ. दिगंबरराव चव्हाण, उपविभागीय कृषी अधिकारी राहुल गायकवाड, संभाजी रेड्डी, मंचकराव देशमुख प्रगतिशील शेतकरी शेखर नाईकवाडे आणि प्राचार्य प्रशांत देशमुख यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते..Smart Mango Farming: ९० एकरांतील व्यवस्थापन तंत्रज्ञानामुळे झाले सुलभ.प्रास्ताविकातून जयप्रभा ग्रामीण विकास मंडळाचे सचिव शिवाजी खोगरे यांनी कार्यक्रम आयोजनामागील भूमिका आणि कृषीविषयक मार्गदर्शनाची आवश्यकता विशद केली. बदलत्या कृषी परिस्थितीत शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीसोबत आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घालावी, शेतीकडे शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहावे आणि फळबागांच्या माध्यमातून उत्पन्नवाढीच्या संधी निर्माण कराव्यात, या उद्देशाने या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते..डॉ. कापसे म्हणाले, आंबा लागवड करताना सुरुवातीपासून योग्य नियोजन करणे, जमिनीच्या परिस्थितीनुसार लागवड पद्धतीची निवड करणे, उपलब्ध साधनसंपत्तीचा कार्यक्षम वापर करणे आणि बागेचे नियमित व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. आंबा अतिघन लागवड पद्धतीचा अवलंब करताना झाडांची वाढ, छाटणी, सूर्यप्रकाश, हवा खेळती राहणे आणि बागेच्या दीर्घकालीन व्यवस्थापनाकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे..उपस्थित शेतकरी, आंबा बागायतदार आणि कृषी क्षेत्रातील मान्यवरांनी आंबा लागवड, बाग व्यवस्थापन, आधुनिक तंत्रज्ञान आणि निर्यातीसंबंधी विविध प्रश्न उपस्थित केले. डॉ. कापसे यांनी या प्रश्नांना उत्तरे दिली. उपस्थित मान्यवरांचा परिचय बबन मस्के यांनी करून दिला. सूत्रसंचालन अजय बुरगे यांनी केले, तर उपस्थितांचे बन्सी पवार यांनी आभार मानले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.