Mango Rejuvenation: आंबा हे कोकणातले महत्त्वाचे फळ आहे. काही महिन्यातच आता आंब्याच्या हंगामाला सुरुवात होणार. आत्ता आंब्याचे झाड वाढीच्या अवस्थेत आहे. या काळात आंब्याच्या बागेचे व्यवस्थापन, झाडांची छाटणी, फुटव्यांची निगा घेतल्यास जुन्या झाडांचे पुनरुज्जीवन करता तसेच आंबा फळाचे चांगले उत्पादन मिळते. यासाठी बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाने मार्गदर्शन केले आहे. .आंबा बागेचे व्यवस्थापन१. बागेची साफसफाईआंबा बागेतील गवत आणि कचरा काढून बाग स्वच्छ ठेवावी. यामुळे जमिनीतील ओलावा कमी होतो आणि झाडांना पाण्याचा ताण मिळतो, जो मोहोर येण्यासाठी आवश्यक असतो. तसेच साफसफाई करताना सुकलेल्या, रोगग्रस्त किंवा निर्जीव फांद्या काळजीपूर्वक कापून टाकाव्यात..Mango Orchard Management: अतिपावसाच्या स्थितीत आंबा बागेचे व्यवस्थापन.२. जुन्या झाडांचे पुनरुज्जीवनपारंपारिक पद्धतीने लागवड केलेल्या जुन्या आणि कमी उत्पादन देणाऱ्या झाडांवर आंबा पुनरुज्जीवन शस्त्रक्रिया करावी. हे तंत्रज्ञान डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने यांनी विकसित केले आहे..पुनरुज्जीवनाचे तंत्रजुन्या आणि उंच झाडांची छाटणी झाडाच्या तळापासून सुमारे दोन तृतीयांश उंचीवर करावी. तर कमी वयाच्या झाडांसाठी छाटणी तळापासून १२ ते १५ फूट उंचीवर करावी.छाटणीनंतर क्लोरपायरीफॉस कीटकनाशक (५ मि.ली./लिटर पाणी) फवारावे. तसेच कीटकनाशकाचे द्रावण छाटणी केलेल्या झाडांच्या मुळांजवळ देखील ओतावे.त्यानंतर १ लिटर ब्लॅक जपान (Black Japan) डांबराच्या द्रावणामध्ये २.५ ग्रॅम कार्बेन्डॅझिमची भुकटी मिसळून कापलेल्या फांद्यांच्या भागावर लावावे. छाटणीनंतर झाडाला दर १० ते १५ दिवसांनी १५० ते २०० लिटर पाणी द्यावे..३. फुटव्यांची निगानवीन फुटवे (कोंब) आल्यानंतर दोन आठवड्यांनी ३ ते ५ फुटवे ठेवून इतर फुटवे काढावेत अर्थात त्याची विरळणी करावी. पहिली विरळणी केल्यानंतर छाटणी केलेल्या भागापासून खाली फुटवे येण्यास सुरुवात होते. या फुटव्यांपैकी दर एक फूटावर एक फुटवा ठेवावा आणि बाकीचे काढून टाकावेत. यामुळे झाडाला योग्य आकार आणि संतुलन मिळते..४. घन लागवडीतील झाडांची छाटणीघन लागवड म्हणजे आंब्याच्या झाडांची लागवड ५ बाय ५ मीटर किंवा ६ बाय ४ मीटर असलेल्या बागांमध्ये सुरुवातीपासूनच नियमित छाटणी करणे महत्त्वाचे आहे. यामध्ये झाडाची उंची कमी ठेवावी. एकमेकांत गेलेल्या फांद्या छाटाव्यात, वाळलेल्या फांद्या काढून टाकाव्यात. तसेच घन लागवड असलेल्या बागांमधील झाडांची उंची दोन ओळींमधील अंतराच्या सुमारे ८०% इतकी ठेवावी..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.