Junnar News: तापमानातील चढ-उतारामुळे आणि ढगाळ हवामानामुळे जुन्नर तालुक्यातील आंबा बागांमधील मोहरावर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याच्या शक्यतेमुळे औषध फवारणीचे व्यवस्थापन सुरू झाले आहे. जुन्नर तालुक्यातील काले, येणेरे, काटेडे, वडज, पारुंडे, चिंचोली, कुसूर, तांबे, बोतार्डे, शिंदे, राळेगण या भागांत मोठ्या प्रमाणावर आंब्याचे उत्पादन घेतले जाते. या भागाला पुणे जिल्ह्यातील आंब्याचे आगर म्हणून ओळखले जाते. .या परिसरातील वैशिष्ट्यपूर्ण चव व सुवासासाठी प्रसिद्ध असलेल्या आंब्याच्या प्रजातीला शिवनेरी हापूस नावाने ‘जीआय’ नामांकन देखील मिळालेले आहे. आंब्याच्या हापूस, राजापुरी, केसर, पायरी या प्रमुख प्रजातींचे उत्पादन घेतले जाते. या भागातील बहुतांश शेतकऱ्यांचे अर्थकारण हे आंबा उत्पादनावर अवलंबून आहे. बहुतांश नागरिक हे नवी मुंबई येथे फळबाजारात व्यापारी असल्याने नवी मुंबई येथे हक्काची बाजारपेठ उपलब्ध आहे..Mango Fruit Drop: श्रीवर्धनमध्ये पुनर्पालवीचा फटका, आंबा फळगळतीमुळे उत्पादक चिंतेत.दरम्यान, गेल्या काही वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणाचा परिणाम आंबा उत्पादनावर होत आहे. झाडांना पालवी फुटणे, ढगाळ हवामानामुळे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढणे, फळ धारणा झाल्यानंतर फळमाशीचा प्रादुर्भाव होऊन फळ खराब होणे, अवकाळी पाऊस व सोसाट्याच्या वाऱ्यामुळे फळांचे नुकसान होणे असे प्रकार गेल्या काही वर्षांपासून होत आहे..Mango Farming Education : बुचकेवाडीला आंबा उत्पादक शेतकऱ्यांसाठी शेतीशाळा.सद्यःस्थितीमध्ये गेल्या काही दिवसांपासून ढगाळ हवामान असल्याने आंबा उत्पादक धास्तावला आहे. या वर्षी बहुतांशी सर्वच ठिकाणी झाडे ही मोठ्या प्रमाणावर मोहराने लगडली आहेत. या ढगाळ हवामानाचा परिणाम होऊन बुरशी, करपा या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. बुरशीजन्य रोग वाढल्यास कणीचे फळात रूपांतर होण्याच्या प्रक्रियेवर थेट परिणाम होण्याची शक्यता असल्याचे येणेरे येथील आंबा उत्पादक शेतकरी सिद्धेश वर्पे यांनी सांगितले..भांडवली खर्चात वाढढगाळ हवामानामुळे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सध्या सर्वत्र आंब्याच्या बागांमध्ये औषधांची फवारणी करण्याची कामे सुरू आहेत. एक एकर क्षेत्रावर किमान पाच वर्षे वयाची झाडे असल्यास असल्यास सरासरी सहा ते सात हजार रुपये इतका फवारणीसाठी खर्च होत असल्याने उत्पादकांच्या भांडवली खर्चात चांगलीच वाढ झाली असून भविष्यात अवकाळी पाऊस झाल्यास मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागण्याची भीती वर्पे यांनी व्यक्त केली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.