Raigad News: रायगड जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना मागील वर्षीच्या हंगामात झालेल्या नुकसानीची भरपाई विमा कंपनीकडून मिळण्यास सुरुवात झाली आहे. सरासरी ४६ ते ५१ टक्के विमा रक्कम बुधवार (ता. २६) पासून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ लागली आहे. रायगड जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना मागील वर्षीच्या हंगामात झालेल्या नुकसानीची भरपाई विमा कंपनीकडून मिळण्यास सुरुवात झाली आहे. सरासरी ४६ ते ५१ टक्के विमा रक्कम बुधवार (ता. २६) पासून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ लागली आहे.: रायगड जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना मागील वर्षीच्या हंगामात झालेल्या नुकसानीची भरपाई विमा कंपनीकडून मिळण्यास सुरुवात झाली आहे. सरासरी ४६ ते ५१ टक्के विमा रक्कम बुधवार (ता. २६) पासून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ लागली आहे. .विमा रकमेच्या वितरणासाठी शेतकऱ्यांनी मागील दोन महिन्यांपासून अधिकारी आणि लोकप्रतिनिधींना भेट देत सातत्याने पाठपुरावा केला होता. परंतु विमा कंपनीच्या आडमुठ्या भूमिकेमुळे भरपाई देण्यात विलंब होत होता. मागील वर्षी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसासोबत तापमानवाढ, ढगाळ वातावरण आणि प्रतिकूल हवामानामुळे आंबा उत्पादनावर मोठा परिणाम झाला होता..Mango Farmers: आंबा उत्पादकांना सुधारित निकषांनुसार भरपाई द्या; जावळे .रायगड जिल्ह्यातील आठ हजार १०४ शेतकऱ्यांनी ‘आंबिया बहार’ योजनेतून विमा काढला होता; मात्र त्यांना भरपाई मिळालेली नव्हती. याबद्दल माहिती देताना आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष चंद्रकात मोकल यांनी सांगितले, की २०२४-२५ आणि २०२५-२६ या दोन वर्षांसाठी रायगड जिल्ह्याचा विमा कारभार युनिव्हर्सल सॉम्पो इन्शुरन्स कंपनीकडे आहे..Organic Mango Satara Farmer : साताऱ्यातील दुष्काळी भागात पिकवला सेंद्रिय केशर आंबा, परेदशात निर्यात, लाखोंची कमाई.पीक विम्याचा शेवटचा दिवस‘आंबिया बहार’ योजनेसाठी मुदत ३० नोव्हेंबर आहे. गेल्या वर्षीच्या भरपाईतील गोंधळामुळे या वर्षी विमा भरण्याकडे कमी लक्ष दिले. मागील वर्षी आठ हजार १०४ शेतकऱ्यांनी विमा घेतला होता; परंतु यंदा अंतिम मुदतीआधी फक्त तीन हजार ४९९ शेतकऱ्यांनीच नोंदणी केली आहे..शेतकऱ्यांना बुधवारपासून विमा रक्कम मिळण्यास सुरुवात झाली आहे. ही रक्कम स्कायमेटकडील हवामान माहितीचे पुनर्मूल्यांकनानुसार होणार आहे. पुढील हंगामासाठी विमा नोंदणीची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर आहे.- कार्तिक नागरे, जिल्हा व्यवस्थापक, युनिव्हर्सल सॉम्पो इन्शुरन्स कंपनी.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.