Palghar News: सध्या पालघर जिल्ह्यात आंब्याच्या झाडाला मोहोर येण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पुढील काही दिवसांतच परिपूर्ण मोहोर येण्याची शक्यता आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी वर्तविली होती. परंतु अचानक जिल्ह्यात बदललेले हवामान बदल आणि पावसाची शक्यता असल्याने शेतकऱ्यांसमोर यंदा आंब्याचा हंगामही कसोटीचाच ठरणार आहे. तसेच ढगाळ वातावरणामुळे पिकावर कीड व रोगांची समस्या जाणवत आहे. .आंब्याच्या फळबागेत सध्या करपा आणि तुडतुडे यांचा प्रादुर्भाव जाणवत असून, नवीन मोहोर जळण्यास सुरुवात झाली आहे. बदलत्या हवामानाचा फटका बसल्यास एकंदरीत आंबा उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे, असे डहाणू तालुक्यातील बोर्डी येथील आंबा उत्पादक शेतकरी यज्ञेश सावे यांनी सांगितले..Alphonso Mango Crisis : अवकाळी पावसाचा हापूस हंगामावर घाला.या पार्श्वभूमीवर कीड रोग सर्वेक्षण सल्ला व व्यवस्थापन प्रकल्प (हॉर्टसॅप)अंतर्गत शेतकऱ्यांच्या बागांना भेटी देण्यात येत आहेत. यादरम्यान कीटकशास्त्रज्ञ डॉ. अंकुर ढाणे आणि संशोधन सहयोगी योगेश मेंगे (हॉर्टसॅप प्रकल्प) यांनी उपाययोजना करण्याचा सल्ला दिला आहे. त्यानुसार आंबा पिकावर १० तुडतुडे प्रति पालवी किंवा मोहोर याप्रमाणे आर्थिक नुकसान पातळी अधिक आढळल्यास तत्काळ उपाययोजना करणे आवश्यक आहे, असे डॉ. अंकुर ढाणे यांनी सांगितले. किडीचे एकात्मिक व्यवस्थापन करताना झाडांची योग्य छाटणी करून बागेत हवा आणि सूर्यप्रकाश खेळता राहील याची काळजी घ्यावी, असा सल्ला शास्त्रज्ञांनी दिला..Cotton Growers: प्रक्रिया उद्योजकांनी साधला कापूस उत्पादकाची संवाद.एकात्मिक व्यवस्थापनकिडीचे एकात्मिक व्यवस्थापन करताना झाडांची योग्य छाटणी करून बागेत हवा आणि सूर्यप्रकाश खेळता राहील याची विशेष काळजी घ्यावी. नत्रयुक्त खतांचा अतिरिक्त वापर टाळून आंबा पिकाचे संतुलित खत व्यवस्थापन करावे, असा सल्ला शास्त्रज्ञांनी दिला आहे..माझ्या आंबा फळबागेत आंबा पिकावर तुडतुडे किडीचा प्रादुर्भाव दिसत आहे. कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी बागेस भेट देऊन आर्थिक नुकसान संकेत पातळी ओलांडल्यास करावयाच्या उपाययोजना सांगितल्या आहेत.- प्रकाश घरत, आंबा बागायतदार, नवली, पालघर.आंब्यावर आढळणारी कीटक मोहोरमधून रस शोषून घेतात. त्यामुळे फुलकळ्या कोमेजून गळून पडतात. नुकसान पातळी वाढण्याआधी उपाययोजना करणे आवश्यक आहे.- डॉ. अंकुर ढाणे, कीटकशास्त्रज्ञ, पालघर.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.