Farmer Support: कोकणातील आंबा उत्पादन घटल्याने व्यापाऱ्यांकडून आगाऊ घेतलेल्या रकमेच्या वसुलीत व्याजाची रक्कम माफ करण्यास सहमती दर्शवण्यात आली. .नवी मुंबई येथील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात माजी खासदार राजू शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली आंबा बागायतदार आणि व्यापारी यांच्यात झालेल्या बैठकीत ही सहमती दर्शविण्यात आली..Mango Farmers: आंबा उत्पादकांसाठी तुटपुंजी मदत.बैठकीत आंबा व्यापाऱ्यांनी बागायतदार शेतकऱ्यांना व्याजाने दिलेली आगाऊ रक्कम, बाजार समितीमधील सौदे, वाहतूक व्यवस्था व सुविधा यांसह विविध समस्या आणि आव्हानांवर चर्चा करण्यात आली..आंबा बागायतदारांना व्यापाऱ्यांनी पिकावर आगाऊ रक्कम दिली आहे. या रकमेवर १८ ते २४ टक्के व्याज आकारणी केली जात आहे. या वर्षी ९० टक्के आंबा उत्पादन घटल्याने व आंबा बागायतदारांनी मोठ्या प्रमाणात बागेसाठी खते, कीटकनाशके, मजुरी खर्चासाठी घेतलेली आगाऊ रक्कम व्याजासह परतावा करणे अशक्य झाले आहे. या वर्षी कोकणातील आंबा उत्पादन ९० टक्के घटले असताना कर्नाटक, तमीळनाडू, केरळ व गुजरातमधून येणारा आंबा हा देवगड व रत्नागिरी हापूस आंबा म्हणून विकला जाऊ लागला आहे. कोकणातील देवगड व रत्नागिरी हापूस आंब्याचे उत्पादन ९० टक्क्यांनी घटूनही दर पाडण्याचे षड्यंत्र सुरू आहे..Mango Farmers: देवगडमधील आंबा बागायतदार एकवटले.कोकणचा हापूस म्हणून परराज्यातून आलेला आंबा संपूर्ण राज्यभर विकला गेल्याने आंब्याचे दर पडू लागले आहेत. यामुळे कोकणातील आंबा बागायतदार अडचणीत सापडल्याचा मुद्दा बैठकीत मांडण्यात आला. त्यामुळे व्यापाऱ्यांकडून आगाऊ घेतलेल्या रकमेवर व्याज घेऊ नये, अशी मागणी करण्यात आली..त्यावर व्यापाऱ्यांनी सकारात्मकता दर्शवित व्याजाची रक्कम न मागता आगाऊ रक्कम वसुलीस सहकार्य करण्याचे ठरविले. याबरोबरच कोकणातून येणारा आंबा रत्नागिरी, सिंधुदुर्ग अशा पद्धतीने जिल्हानिहाय वर्गवारी करण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्हानिहाय आंबा बाजार समितीत किती दाखल झाला, याची माहिती दैनंदिन प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला. रत्नागिरी किंवा देवगड हापूस म्हणून बोगस आंब्याची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी बागायतदार व व्यापाऱ्यांनीही केली..बैठकीस कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव शरदकुमार झरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश बालवडकर, कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड व पालघर जिल्ह्यांतील बागायतदार, एपीएमसी मार्केटमधील प्रमुख व्यापारी आणि बाजार समितीचे अधिकारी उपस्थित होते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.