Climate Change Impact: महाराष्ट्रात गेल्या तीन-चार दिवसांपासून अवकाळी पावसामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. रायगड जिल्ह्यातसुद्धा अचानकपणे ढगाळ वातावरण निर्माण झाले असल्याने आंबा पिकासह वेगवेगळ्या भाजी पिकांवरही त्याचा मोठा परिणाम होत आहे. .मागच्या आठवडाभरापूर्वी रायगड जिल्ह्यासह पेण तालुक्यात कडक उन्हाच्या लाही लाहीने नागरिक हैराण झाले होते; मात्र अचानक वातावरणात झालेल्या बदलामुळे शेतकरी तसेच बागायतदार चिंतेत सापडले आहेत..Cloudy Weather Impact: बाजरीला ढगाळ वातावरणाचा फटका.विशेषतः आंबा बागायतदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आंबा पिकाचा महत्त्वाचा टप्पा सुरू आहे. या ढगाळ वातावरणात होणाऱ्या अवकाळी पावसामुळे फळगळ तसेच बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता शेतीतज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे..Cloudy Weather Impact: ढगाळ वातावरणाचा खानदेशात पिकांना फटका.हवामानाचा फटका काकडी, वांगी, टोमॅटो, मिरची, भेंडी यांसारख्या भाजीपाला पिकांबरोबरच उन्हाळ्यात येणाऱ्या काजू, .जांभूळ आणि करवंदे या फळपिकांवरही परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे यावर्षी उत्पादन कमी होण्याची भीती बागायतदार शेतकरी व्यक्त करीत आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.