Falpike Vima: आंबा, काजू बागायतदारांनी पीकविम्याचे हप्ते भरूनही काही तांत्रिक कारणांमुळे अनेक शेतकऱ्यांना पीकविम्याचा परतावा मिळालेला नाही. त्यामुळे पीकविमा भरलेल्या सर्व बागायतदारांना सरसकट विमा परतावा मिळावा, अशी मागणी देवगड पंचायत समितीच्या सभेत करण्यात आली..सभापती गणेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली देवगड पंचायत समितीची मासिक सभा झाली. या सभेला गटविकास अधिकारी नीलेश जगताप, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र सावंत आदी उपस्थित होते. देवगड तालुक्यातील आंबा, काजू उत्पादकांनी पीकविम्याचा हप्ता भरला..Fruit Crop Insurance Scheme: फळपीक विमा योजनेसाठी फार्मर आयडीचे बंधन.जोखीम कालावधीत तालुक्यात सतत ढगाळ वातावरण, अवकाळी पाऊस, दाट धुके, तापमानवाढ आदी समस्यांना सामोरे जावे लागले. त्यामुळे संपूर्ण देवगड तालुक्यातील आंबा, काजू पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. परंतु हवामान केंद्रांकडील अचूक माहिती उपलब्ध नसल्याने अनेक मंडलांतील बागायतदार भरपाईपासून वंचित राहिले..Fruit Crop Insurance: फळपीक विम्याकडे बागायतदारांची पाठ.हा मुद्दा सदस्यांनी सभेत उपस्थित केला. हवामान केंद्रांतील दोषाचा भुर्दंड शेतकऱ्यांना का, असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला. हवामान केंद्रांची देखभाल होत नसल्याने नोंदी अचूक राहत नाहीत. या संदर्भात सभापती राणे यांनी आंबा व काजू बागायतदारांना सरसकट पीकविम्याची रक्कम मिळाली पाहिजे, अशी भूमिका मांडली..या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कृषी अधिकारी आणि विमा कंपनीच्या प्रतिनिधींची संयुक्त बैठक बोलवावी, अशी सूचना त्यांनी कृषी विभागाला दिली. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी आर्थिक संकटात आहेत. त्यामुळे त्यांना सरसकट पीकविमा परतावा मिळालाच पाहिजे, अशी भूमिका सर्वांनी घेतली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.