Groundwater Restrictions: पारनेर तालुक्यातील मांडओहळ धरण परिसर उपविभागीय अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार टंचाईग्रस्त क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. या संदर्भात महाराष्ट्र भूजल अधिनियमानुसार तरतुदी लागू करण्यात आल्या असून भूजल उपसा व पाणी स्रोतांच्या वापरावर विविध निर्बंध घालण्यात आले आहेत. येथून पाणी उपसा करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे..अहिल्यानगर जिल्ह्यात पाणीटंचाई आहे. पाऊसही फारसा होईल, असे दिसत नाही. त्यामुळे आगामी काळात पिण्याच्या पाण्याची टंचाई होणार नाही यासाठी प्रशासन कारवाई करत आहे. उपलब्ध पाण्याचा अधिक काटकसरीने वापर व्हावा यासाठी प्रयत्न दिसत आहे. आगामी टंचाई लक्षात घेऊन मांडओहळ धरणाचा परिसर टंचाई म्हणून घोषित केला आहे. कायद्यानुसार सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांपासून ५०० मीटर परिसरात कोणत्याही प्रकारची नवीन विहीर खोदण्यास किंवा भूजल उपसा करण्यास बंदी घालण्यात आली आहे. .Ahilyanagar Water Crisis: अहिल्यानगर जिल्ह्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढतेय.तसेच पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांवर प्रतिकूल परिणाम होईल, अशा कृतीस मनाई करण्यात आली आहे. तसेच स्वराज्य संस्थांना या स्रोतांचे संरक्षण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शासकीय पाणीपुरवठा योजनांशिवाय इतर कोणत्याही माध्यमातून पाणी उपसा करणाऱ्या मोटारी, पाइप किंवा अन्य साहित्य १५ जूननंतर आढळल्यास ते जप्त करण्यात येणार असून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा देण्यात आला आहे..Water Scarcity: शिरूरमधील दहा गावांचा घसा कोरडा.सार्वजनिक तलाव व पाणी स्रोतांमधूनही अनधिकृत पाणी उपसा करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. या धरणात सध्या मर्यादित पाणीसाठा उपलब्ध आहे. येथून पारनेर तालुक्यातील २९ गावांना ३० टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे..सहकार्य करण्याचे आवाहनभविष्यात टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करताना अडचणी येऊ नयेत यासाठी निर्बंध घालण्यात आले आहेत. या परिसरातील नागरिक व शेतकऱ्यांनी सहकार्य करावे असे अवाहन प्रशासनाने केले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.